महाराष्ट्र

maharashtra

Shahrukh Khan Extortion case: समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटक करता येणार नाही- मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Jun 8, 2023, 1:36 PM IST

समीर वानखेडेंच्या आजच्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने 23 जूनपर्यंत समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलासा आहे. तसेच त्यांच्या याचिकेमध्ये सुधारणा करण्यासाठी मंजुरी देखील दिली आहे.

Shahrukh Khan Extortion case
समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटक नाही

मुंबई: आर्यन खान ड्रग्स प्रकरणांमध्ये तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे त्या माध्यमातून बेहेशिबी मालमत्ता जमा केली, असे आरोपपत्र सीबीआयने दाखल केले आहे. त्या अंतर्गत समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. परंतु मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील सुनावणी सुरू आहे.

समीर वानखेडे यांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी एनसीबी आणि सीबीआय यांनी एकत्रितपणे त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणांमध्ये आर्यन खानला सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपयाची खंडणी मागितल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप केलेला आहे. हा आरोप समीर वानखेडे यांनी नाकारलेला आहे. तसेच त्यांच्यावरील एफआयआर रद्द करावा असे देखील त्यांनी न्यायालयामध्ये मागणी केली होती. मात्र ती न्यायालयाने फेटाळली. आज समीर वानखेडे यांना न्यायालयामध्ये प्रतिज्ञा प्रतिज्ञापत्र सादर करायचे केले. मात्र याचिकेमध्ये काही सुधारणा करण्याची अनुमती त्यांनी न्यायालयाकडे मागितली. ती मागणी न्यायालयाने मंजूर केली.

सीबीआयला दोन आठवडे वेळ:सीबीआयच्यावतीने वानखेडे यांचे प्रतिज्ञापत्र वाचन करण्यासाठी आम्हाला दोन आठवडे मुभा मिळावी, असे सीबीआयने न्यायालयात सांगितले. त्यामुळे न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत देत पुढील सुनावणी 23 जून रोजी निश्चित केली. तसेच ही सुनावणी दुपारी अडीच वाजता होणार आहे. त्यामध्ये पूर्ण युक्तिवाद करण्याची संधी दिली जाईल, असे देखील न्यायालय नमूद केले. समीर वानखेडे यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी प्रतिक्रिया देताना नमूद केले की, कोर्टापुढे आज सुनावणी झाली.

समीर वानखेडेंवरील आरोपाबाबत सीबीआय ठाम:सीबीआयने म्हटले होते, की जसे दुसऱ्या आरोपीला अंतरिम दिलासा नाकारला. तसाच समीर वानखेडे यांना देखील अंतिम दिलासा देऊ नये. आमची देखील बाजू आहे , ती समजून घेतली पाहिजे. चौकशीस आमचे सहकार्य राहणार असल्याचे सीबीआयने सांगितले. याआधी 3 जून रोजी सीबीआयवतीने जे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये समीर वानखेडे यांचा दावा अमान्य करण्यात आलेला आहे. त्यांच्यावरील दाखल केलेल्या एफ आय आर तसेच त्यांच्या संदर्भात केले गेलेले आरोप यावर सीबीआय ठाम असल्याचे सीबीआयने त्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे. याप्रकरणी 23 जून रोजी दोन्ही बाजूने युक्तिवाद होणार आहे.

हेही वाचा:

  1. Sameer Wankhede Bribe Case: सॅम डिसूजाला अटकेपासून संरक्षण नाहीच, चौकशीला सामोरे जाण्याचे हायकोर्टाचे आदेश
  2. Sameer Wankhede News : दाऊद इब्राहिमच्या नावाने समीर वानखेडे यांना धमकी; पत्नी क्रांती रेडकर पोलिसात करणार तक्रार
  3. CBI Affidavit In Court: समीर वानखेडेवरील एफआयआर व आरोप उचित, सीबीआयचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

ABOUT THE AUTHOR

...view details