महाराष्ट्र

maharashtra

School Bus Accident : दारूच्या नशेत टल्ली स्कूल बस ड्रायव्हर 40 विद्यार्थ्यांना घेऊन निघाला शाळेकडे; पाहा पुढे काय झाले ?

By

Published : Dec 14, 2022, 12:50 PM IST

दारूच्या नशेत असलेला स्कूल बस ड्रायव्हर (Drunken school bus driver) 40 विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघाला. मात्र बसवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यात एका ऑटो रिक्षाला धडक (bus rammed auto rickshaw) दिली. सुदैवाने बसमधील विद्यार्थी थोडक्यात वाचले. आरोपीवर एनआरआय पोलीस ठाण्यात भादंवि कलम 336 तसेच मोटार वाहन कायदा 185 अंतर्गत गुन्हा दाखल (case filed against bus driver) झाला असून त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

School Bus Accident
स्कूल बस अपघात

स्कूल बस अपघात

नवी मुंबई : उलवे येथे 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या IMS स्कूलच्या स्कूल बसचा ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत (Drunken school bus driver) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत फूल टल्ली असलेल्या या ड्रायव्हरने उभ्या असलेल्या एका रिक्षाला धडक दिल्यानंतर (bus rammed auto rickshaw) हा प्रकार उघडकीस आला. सकाळी साडेआठच्या सुमारास उलवे सेक्टर-21 मध्ये ही घटना घडली. अशोक जनार्दन थोरात (वय 65 वर्षे) असे या आरोपी ड्रायव्हरचे नाव असून तो उलवे सेक्टर 19 मधील प्रथमेश अपार्टमेंटमधला रहिवासी आहे. आरोपीवर एनआरआय पोलीस ठाण्यात भादंवि कलम 336 तसेच मोटार वाहन कायदा 185 अंतर्गत गुन्हा दाखल (case filed against bus driver) झाला असून त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. या प्रकरणी एनआरआय पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मंगेश बाचकर अधिक तपास करत आहेत.

खासगी क्लासच्या बसचा अपघात ःनुकताच रविवारी सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. एकूण 48 विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईतील खासगी क्लासची पिकनिक निघाली होती. या पिकनिकदरम्यान, संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील खोपोली जवळ बोरघाटात ही बस उलटली. बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात हितीका खन्ना नावाची एक 16 वर्षांची विद्यार्थिनी तर राजेश म्हात्रे नावाचा 16 वर्षांचा विद्यार्थी मृत्यूमुखी पडला.

परभणीतही बस अपघात :त्याआधी परभणीतही एसटी बस आणि स्कूल बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला होता. त्यामुळे पुन्हा एकदा स्कूल प्रशासनाचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतचे धोरण आणि विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या परिवहन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वर उल्लेखलेल्या विविध ठिकाणच्या अपघातानंतर तरी राज्यातील स्कूल प्रशासन जागे होणार का ? की विद्यार्थ्यांच्या जीविताशी असेच खेळत राहणार असा प्रश्न आता पालकांमध्ये चर्चिला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details