महाराष्ट्र

maharashtra

Sanjay Raut : हे सरकार राहिले तर राज्याचे पाच तुकडे होणार - संजय राऊत

By

Published : Nov 23, 2022, 10:57 AM IST

Updated : Nov 23, 2022, 12:44 PM IST

दिशा सालियान प्रकरणात सीबीआयने अहवाल दिला आहे. भाजप नेत्यांनी ( Sanjay Raut on Disha Salian ) आदित्य ठाकरेंची माफी मागावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. सरकार सुरक्षा काढून ( Sanjay Raut on security issue ) जीवाशी खेळत आहे. मात्र काही झाले तरी सुरक्षा सरकारकडे मागणार नाही.

Sanjay Raut
संजय राऊत

मुंबई :हे सरकार राहिले तर राज्याचे पाच तुकडे ( Sanjay Raut on border issue ) होणार आहे. भाजपला महाराष्ट्राचे लचके तोडायचे आहेत. मुख्यमंत्री सीमाप्रश्नाचा वाचा फोडणार आहेत का? मात्र शिंदे फडणवीस सरकार हतबल आहेत, अशी टीका शिवसेना नेते ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, की पडद्याआड राजकीय भूकंपाची तयारी होत आहे. केंद्रात असल्याने रावसाहेब दानवेंना त्यांची माहिती मिळाली असेल. त्यामुळे ते बोलले असणार आहे. दिशा सालियान प्रकरणात सीबीआयने अहवाल दिला आहे. भाजप नेत्यांनी ( Sanjay Raut on Disha Salian ) आदित्य ठाकरेंची माफी मागावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. सरकार सुरक्षा काढून ( Sanjay Raut on security issue ) जीवाशी खेळत आहे. मात्र काही झाले तरी सुरक्षा सरकारकडे मागणार नाही. याबाबत जनतेच्या मनात प्रश्न आहेत. काही बरेवाईट झाले तर हे सरकार जबाबदार असेल असा त्यांनी पुनरुच्चार केला.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सध्या चर्चेचा विषय : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच कर्नाटक सरकारने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर देखील आता आपला हक्क सांगायला सुरुवात केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून विरोधक सध्या शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरत आहेत. तर दुसरीकडे शिंदे फडणवीस सरकारकडून विरोधी गटाच्या नेत्यांची सुरक्षा देखील कमी केली जात आहे. या सर्व मुद्द्यांवरून शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते आपल्या निवासस्थानी बोलत होते.


कुणाला मुंबई तर कुणाला महाराष्ट्र तोडायचा आहे :यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "हा सीमावाद यासाठी होतोय कारण महाराष्ट्रात एक अत्यंत कमजोर, हतबल सरकार बसलेले आहे. त्यांना हा महाराष्ट्रच माहिती नाही. सध्याचे आपले जे मुख्यमंत्री आहेत मागच्या अनेक वर्ष या प्रश्नावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. इतक्या वर्षात त्यांनी या सीमा प्रश्नावर कोणता विषय छेडला? कोणत्या विषयाला हात घातला? याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं. मुख्यमंत्री सांगतात आम्ही पंतप्रधानांशी चर्चा करू असं ते कालच म्हणाले आणि आज कर्नाटक सरकारने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. कर्नाटकात भाजपचेच सरकार आहे. महाराष्ट्रात देखील भाजपच्या नेतृत्वाखाली मिंध्ये गटाचे सरकार आहे. याचा अर्थ इतकाच कोणाला मुंबई तोडायची आहे तर कोणाला महाराष्ट्र कुर्तडायचा आहे. आणि हे आमचे मुख्यमंत्री त्यांच्या चाळीस आमदारांना घेऊन गुहाटीला चाललेत. आता तिकडून आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आणखी एका जिल्ह्यावर दावा केला नाही म्हणजे मिळवलं"


दोन युवा नेते भेटत आहेत :आदित्य ठाकरे सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, "आदित्य ठाकरे यांच्या या एकदिवसीय दौऱ्याकडे फक्त बिहार दौरा म्हणून बघू नका. देशाच्या राजकारणात काही हालचाली होत आहेत. त्या दृष्टीने बघा. राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने दोन युवा नेते भेटत आहेत त्या दृष्टीने बघा. भाजपचेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील म्हटले आहे पुढच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात काय होईल सांगता येत नाही. कदाचित त्यांना सुद्धा माहिती मिळालेली असावी की देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काय घडतंय."

Last Updated : Nov 23, 2022, 12:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details