महाराष्ट्र

maharashtra

Sameer Wankhede News: समीर वानखेडेंना दिलासा; अटकेपासून संरक्षण कायम, मात्र कोणतीही माहिती माध्यमांना न देण्याची तंबी

By

Published : May 22, 2023, 12:28 PM IST

Updated : May 22, 2023, 3:16 PM IST

Sameer Wankhede
समीर वानखेडे बेहिशेबी मालमत्ता प्रकरण

समीर वानखेडे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी खंडपीठ बदलल्याने नव्याने सुनावणी झाली आहे. आजच्या सुनावणीत समीर वानखेडेंना दिलासा मिळाला आहे. त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. परंतु कोणतीही माहिती माध्यमांना न देण्याची तंबी न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

मुंबई :आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशी करत असतानाच बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी सीबीआयने तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. तसेच समीर वानखेडे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांना 8 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.


न्यायालयातील युक्तिवाद :आज झालेल्या सुनावणीत वानखेडेच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, त्यांनी भ्रष्टाचारा सारखी कृती केलेली नाही. जर आरोपीने चौकशीकरिता सहकार्य केले नाही तर अटक करतात, परंतु समीर वानखेडे हे सहकार्य करत आहेत. त्यामुळे त्यांना अटकेची गरज नाही. तर सीबीआयने त्यांना अटक केली नाही, तर पुरावे नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. अटक केली नाही तर चौकशीवर विपरित परिणाम होईल, असेही सीबीआयने सांगितले.


समीर वानखेडे यांना दिलासा : कर्डिलेया क्रूझवर कथित आर्यन खान ड्रग प्रकरणामध्ये नवीन वळण समोर आलेले आहे. आर्यन खानचे नाव शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकले, असा मोठा दावा त्या संदर्भातील चौकशी अधिकाऱ्याकडून केला गेलेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत समीर वानखेडे यांना दिलासा दिला. मात्र मुंबई उच्च न्यायालयात याबाबत दावा दाखल करावा, असे म्हटले होते. त्यामुळे सुट्टीकालीन न्यायालयात समीर वानखेडे यांनी दावा दाखल होता.

चौकशी आणि तपासासाठी सहकार्य : मुंबई उच्च न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये 22 मे 2023 पर्यंत जबरदस्तीने कोणतीही अटक सीबीआयने समीर वानखेडे यांना करू नये. तसेच चौकशी आणि तपासासाठी समीर वानखेडे यांनीदेखील सहकार्य करावे, असे न्यायालयाने आपल्या निर्देशात म्हटले आहे. समीर वानखेडे यांची अटकेपासून संरक्षणाची आज मुदत संपत आहे.

तारीख पे तारीख : मागील वेळी न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. आज मात्र एम. एम. साठे आणि अभय आहुजा या न्यायमूर्तींच्या खंडपीठांसमोर ही सुनावणी होणार आहे. खंडपीठ बदलल्याने नव्याने सुनावणी झाली आहे. परिणामी 'तारीख पे तारीख' होण्याची शक्यता आहे. आज त्यांची अटकेपासून संरक्षणाची तारीख संपत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात त्यांची सुनावणी पार पडली.

हेही वाचा :

  1. Sameer Wankhede News: अतिक अहमद सारखी घटना होण्याची समीर वानखेडेंना भीती; मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणार विशेष सुरक्षा
  2. Jayant Patil : जयंत पाटील ईडी चौकशीसाठी रवाना; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची कार्यालयाबाहेर प्रचंड घोषणाबाजी
  3. Sexual Assault Case Thane : ठाण्यात ६ वर्षीय मुलीचा विनयभंग, खून प्रकरणात पोलीस अपयशी, आरोपी निर्दोष
Last Updated :May 22, 2023, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details