महाराष्ट्र

maharashtra

पोर्नोग्राफी प्रकरण : शर्लिन चोप्रा - पुनम पांडेला हायकोर्टाचा दिलासा, शर्लिन आज गुन्हे शाखेसमोर हजर होणार

By

Published : Jul 27, 2021, 10:58 AM IST

Updated : Jul 27, 2021, 11:43 AM IST

अभिनेत्री शर्लिन चोप्रा
अभिनेत्री शर्लिन चोप्रा

पोर्नोग्राफी केस संबंधित अभिनेत्री शर्लिन चोप्राला क्राईम ब्राँचच्या प्रॉपर्टी सेलने समन्स जारी केला आहे. यात तिला मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या आत जवाब नोंदवण्यासाठी तिला हजर रहावे लागणार आहे.

मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राला मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने समन्स जारी केला आहे. यात तिला मंगळवारी सकाळी 11 वाजता जबाब नोंदवण्यासाठी हजर राहाण्यास सांगण्यात आले आहे. त्याचवेळी अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या दोघींवर २० सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करु नये असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलीसांना दिले आहेत.

शर्लिन चोप्राने दिला होता जवाब

शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवण्यासाठी 19 जुलैला अटक करण्यात आली आहे. कुंद्रासह इतर 11 जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी 27 जुलैला राज कुंद्रा यांची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यालाही मंगळवारी कोर्टात हजर केले जाईल.


हेही वाचा -
राज कुंद्रावर शर्लिन चोप्राचा गंभीर आरोप

काय म्हणाली शर्लिन

अनेक मीडियाकर्मी शर्लिन चोप्राला या विषयाबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करीत होते. या बद्दल खुलासा करताना ती म्हणाली , ''या प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलच्या इन्वेस्टीगेटिंग टीमला ज्या व्यक्तीने सर्वात पहिल्यांदा जवाब नोंदवला ती मी होती. याबद्दल टीमला माहिती पुरवणारी मी होते. जेव्हा मला समन्सची नोटीस पाठवण्यात आली होती तेव्हा मी भूमीगत झाले नाही. गायब झाले नाही. हे शहर किंवा देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. मार्च 2021 मध्ये सायबर सेलच्या ऑफिसवर जाऊन मी माझा निष्पक्ष जवाब नोंदवला. या विषयावर बोलण्यासारखे खूप काही आहे. पण हा विषय न्यायालयात आहे त्यामुळे त्यावर जास्त भाष्य करु शकत नाही. मी पत्रकरांना विनंती करते की सायबर सेलकडे मी जो जवाब दिला आहे त्याबद्दलचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा.''

पोर्नोग्राफी केसला मोठे वळण

यात गेहना वाशिष्ठने राजला पाठिंबा दर्शवला आहे. तिने एरॉटिक बनवत नसून पॉर्न बनवत असल्याचा दावा केला आहे. तसेच शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेने आपले मत व्यक्त केली आहे. शर्लिन चोप्राने पहिल्यांदा आपले मत व्यक्त केले आहे. मी पहिल्यांदा मुंबई सायबर सेलकडे जाऊन याबाबत तक्रार केले असल्याचे तिने व्हीडीयोमध्ये सांगितले आहे. यात तिने आर्म्सप्राईम या राजच्या कंपनीबाबतही मोठा खुलासा केला आहे.

Last Updated :Jul 27, 2021, 11:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details