महाराष्ट्र

maharashtra

सचिन वाझे प्रकरण : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आणखी एक जण ताब्यात

By

Published : Mar 18, 2021, 4:13 PM IST

वाझेंसोबत आणखी एक व्यक्ती या कटामध्ये सामील असून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे कळत आहे. मात्र, या व्यक्तीचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबईतील कार्यालयामध्ये न्यायवैद्यक प्रयोग शाळेचे एक पथक दाखल झाले असून सचिन वाझे यांनी जाळलेला सदरा आणि इतर पुराव्यांची ओळख पटविण्याचे काम या ठिकाणी केले जात आहे.

मुंबई
मुंबई

मुंबई- राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने बुधवारी सचिन वाझे यांच्या ठाण्यातील घराची झडती घेतली होती. त्यांच्या गाडीमध्ये काही महत्त्वाचे पुरावे आढळून आले आहेत. वाझेंसोबत आणखी एक व्यक्ती या कटामध्ये सामील असून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे कळत आहे. मात्र, या व्यक्तीचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबईतील कार्यालयामध्ये न्यायवैद्यक प्रयोग शाळेचे एक पथक दाखल झाले असून सचिन वाझे यांनी जाळलेला सदरा आणि इतर पुराव्यांची ओळख पटविण्याचे काम या ठिकाणी केले जात आहे. या बरोबरच मुंबई पोलीस खात्यातील 'सीआययु'च्या दोन अधिकार्‍यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

मुंबई

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात असताना सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझेंच्या झडतीत राष्ट्रीय तपास यंत्रणेला दोन सदरे मिळाले असून हे दोन्ही सदरे 25 फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओ गाडी पार्क करत असताना सचिन वाझे यांनी परिधान केली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यातील एक सदरा सचिन वाझेंनी मुलूंड टोल नाक्याजवळ रॉकेल टाकून जाळला असल्याचीही माहिती समोर येत आहे.

काही आयपीएस अधिकाऱ्यांचीसुद्धा चौकशी होणार

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझे ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलची तपासणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने केली असून या हॉटेलमधील सीसीटीव्ही दृश्ये पडताळून वाझेंना भेटायला येणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. यात काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. याबरोबरच मुंबई पोलीस खात्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांचीसुद्धा चौकशी केली जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details