महाराष्ट्र

maharashtra

चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवालाच्या घरी एनसीबीचे छापे; ड्रग्ज जप्त

By

Published : Nov 8, 2020, 4:55 PM IST

7-8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून, एनसीबी अनेक ड्रग पेडलर्सच्या घरी छापा टाकत होती. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत 5 ड्रग पेडलरना ताब्यात घेतले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात पकडलेल्या संशयितांच्या चौकशीदरम्यान निर्मात्याचे नाव समोर आले आहे.

Feroz Nadiadwala
फिरोज नाडियाडवाला

मुंबई -बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) ड्रग्ज जप्त केले आहेत. आता एनसीबी लवकरच निर्मात्यास समन्स पाठवण्याची तयारी करत आहे. माहितीनुसार, एनसीबी फिरोजच्या घरी पोहोचली त्यावेळी तो घरी नव्हता.

7-8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून, एनसीबी अनेक ड्रग पेडलर्सच्या घरी छापा टाकत होती. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत 5 ड्रग पेडलरना ताब्यात घेतले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात पकडलेल्या संशयितांच्या चौकशीदरम्यान निर्मात्याचे नाव समोर आले आहे. शनिवारी सायंकाळी एनसीबीने नवी मुंबई आणि मुंबईच्या विविध भागात छापा टाकला, तेथून एजन्सीकडून गांजा आणि एमडी व्यावसायिक प्रमाणात सापडला. या छाप्यात एनसीबीने चार जणांना अटकही केली होती, ज्यांची चौकशी सुरू आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबी मुंबईच्या पथकाने काल मुंबईतील मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैरणे या पाच ठिकाणी छापे टाकले. येथून रोकडसह वाहनेही जप्त केली आहेत.

दरम्यान, एनसीबी लवकरच फिरोज नाडीयाडवाला यांना समन्स देईल आणि त्यानंतर त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details