महाराष्ट्र

maharashtra

Nanhi Pari Foundation : मुलींच्या आरोग्य, शिक्षणासाठी झटतेय नन्ही परी फाउंडेशन

By

Published : Apr 13, 2023, 5:37 PM IST

बारा वर्षापर्यंतच्या मुलींच्या आरोग्याच्या विविध समस्या त्यांच्या विविध आजारांसाठी आणि शस्त्रक्रियांसाठी तसेच मुलींच्या शिक्षणासाठी मुंबईतील नन्ही परी फाउंडेशनच्या वतीने कार्य केले जात आहे. यासाठी समाजाने अधिकाधिक मदत करावी असे, आवाहन या फाउंडेशनचे समन्वयक फैसल मलिक यांनी केले आहे.

Nanhi Pari Foundation
Nanhi Pari Foundation

नन्ही परी फाउंडेशन मदतीसाठी नागरिकांना अवहान

मुंबई :उत्तर प्रदेशातील गरीब परिस्थिती असलेल्या सना इस्लाम मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांना आपली कर्णबधिर कन्या मेहरबानू यांच्यावर उपचार करायचे आहेत. यासाठी त्यांना मुलीच्या उपचारासाठी हिंदुजा रुगणालयात काही रक्कम भरायची आहे. मात्र, त्यांच्याकडे पैसे नसल्याने अनेक अडचणीचा सामना करवा लागत आहे. मुलीच्या उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी हिंदुजा रुगणालयाने त्यांना नन्ही परी फाउंडेशनशी संपर्क साधण्याची विनंती केली आहे. अशीच घटना काही दिवसापूर्वी असनद पठाण या मुलीबाबत घडली होती. असनद पठाण या मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी पैसे नसल्याने तिचे आई-वडील उनेजा, सौद पठाण यांनी ननही परी फाउंडेशनकडे मदत मागितली होती. त्यांनी मदत मागितल्यानंतर फाउंडेशनने त्यांनी मदत केली, मात्र दोनच दिवसापूर्वी शस्त्रक्रिया दरम्यान असनद यांचा मृत्यू झाला होता.

काय आहे नही परी फाउंडेशन? :मुंबईतील दादर येथे नन्ही परी फाउंडेशनचे कार्यालय आहे. ही सामाजिक संस्था असून गेल्या सहा वर्षांपासून बारा वर्षांपर्यंतच्या बालिकांच्या शिक्षण, आरोग्यासाठी काम करते त्याचप्रमाणे अनाथ बालकांसाठीही काम करते. या संस्थेच्या वतीने आतापर्यंत 4 हजार बालकांच्या शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांसाठी मदत केली आहे. तर 3 हजार बालकांना शिक्षणासाठी मदत केल्याची माहिती फाउंडेशनचे समन्वयक फैसल मलिक यांनी दिली.

रुग्णालयांकडून रुग्णांना होते शिफारस? :मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये लहान मुलांवरील शस्त्रक्रिया अथवा अन्य उपचारांसाठी लागणाऱ्या खर्चाविषयी त्यांच्या पालकांना अवगत केले जाते. मात्र, ज्यांचे पालक हा खर्च पेलू शकत नाहीत अथवा ज्यांची आर्थिक मिळकत कमी आहे अशा पालकांसाठी रुग्णालयांकडूनच नन्ही परी सारख्या संस्थांची नावे, क्रमांक दिले जातात. या संस्थांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मदतीवर या बालकांचे उपचार केले जातात मुंबईतील वाडिया हिंदुजा तसेच अन्य रुग्णालयांमधून, खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून नन्ही परी फाउंडेशनकडे रुग्ण पाठवले जातात, असेही मलिक यांनी सांगितले.

अन्य सामाजिक मदतही :लहान बालकांच्या आरोग्य, शिक्षणासाठी या फाउंडेशन मार्फत ज्या पद्धतीने मदत केली जाते. त्याचप्रमाणे समाजातील इतर घटकांसाठीही मदत केली जाते. मालाड येथे झालेल्या झोपडपट्टी जळीत कांडातील पीडितांना अन्नधान्य, अंथरून पांघरूनही या संस्थेच्या वतीने पुरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे महिलांना सॅनिटरी पुरवले जातात. समाजामध्ये अशा पद्धतीने काम करण्यासाठी लागणाऱ्या मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे आणि संस्थेला मदत करावी असे आवाहन मलिक यांनी केले आहे.

हेही वाचा - State Child Rights Commission: राज्य बाल हक्क आयोगाकडून 15 शाळांना नोटीस; विद्यार्थ्यांचे शालेय कागदपत्रे रोखू नका

ABOUT THE AUTHOR

...view details