महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत गणेश आगमनावेळी भक्तांना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा विसर

By

Published : Aug 22, 2020, 7:31 PM IST

मुंबईतील अनेक ठिकाणी गणेश आगमनावेळी भक्तांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करण्याचा विसर पडला होता. गणेश भक्तांना याबाबत विचारले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर न केल्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

mumbai ganesh festival
मुंबई गणेशोत्सव

मुंबई- मुंबई आणि परिसरात मागील काही महिन्यांपासून कोरोना विषाणू प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच गणेशोत्सव सुरु होत आहे. गणपती आगमनाच्या काळात जनतेने काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन सरकारकडून वेळोवेळी करण्यात आले आहे. मात्र, सरकारच्या या आवाहनाला गणेश भक्तांकडून हरताळ फासला जात असल्याचे चित्र मुंबईत ठिकठिकाणी दिसून आले. गणेश भक्तांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करण्याचा विसर पडला होता.

श्री गणेशाच्या आगमनावेळी भक्तांना मास्कचा विसर

आज मुंबईत घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना करण्याची लगबग सुरू होती. गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन जाताना असंख्य भक्तांना मुंबईत कोरोनाचे संकट असल्याचा विसर पडला असल्याचे दिसून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात महत्वाचे मास्क वापरणे आवश्यक आहे. मात्र, अनेक भक्तांनी मास्क वापरले नसल्याचे दिसून आले. या संदर्भात पीएमजीपी कॉलनी, मानखुर्द परिसरात काही भक्तांना या संदर्भात विचारले असता, त्यांच्याकडून बाप्पा आलेत, आता आमचे तो रक्षण करेल, आम्हाला मास्कची गरज नाही, असे उत्तर दिले. तर काही भक्तांनी यावर उडवाउडवीची उत्तरे दिली.

कालपर्यंत मुंबई आणि परिसरात 1 लाख 34 हजार, 228 बाधित रुग्णसंख्या आढळून आली होती. 7 हजार 356 जणांचा कोरोना आणि इतर कारणांमुळे मृत्यू झालेला आहे. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही 18 हजार 299 आहे. शुक्रवारी मुंबई आणि परिसरात एकूण 1 हजार 406 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुंबई आणि परिसरात गणेशोत्सव साजरा करत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापर न केल्यामुळे मुंबईत कोरोनाचे संकट वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details