महाराष्ट्र

maharashtra

Shraddha Murder Case : श्रद्धाच्या कुटुंबीयांची किरीट सोमैय्यांनी घेतली भेट ; आरोपीवर कडक कारवाईची मागणी

By

Published : Nov 22, 2022, 7:23 AM IST

Updated : Nov 22, 2022, 7:43 AM IST

वसईत राहणाऱ्या श्रद्धा (२७) या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या आरोपी आफताब आमीन पुनावाला याने गळा आवळून हत्या (Shradda Murder Case) केली. या पिडीत कुटूंबाला, नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी यांना भेटण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी भाजपचे किरीट सोमैय्यांनी सोमवारी दुपारी भेट (Kirit Somaiya visited Shraddha walkar family) घेतली.

Shradda Murder Case
श्रद्धा वालकर खून प्रकरण

मुंबई : वसईत राहणाऱ्या श्रद्धा या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या आरोपी आफताब आमीन पुनावाला यानेगळा आवळून हत्या (Shradda Murder Case)केली. तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याची हादरून टाकणारी घटना दिल्ली येथे घडली होती. या पिडीत कुटूंबाला, नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी यांना भेटण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी भाजपचे किरीट सोमैय्यांनी सोमवारी दुपारी भेट (Kirit Somaiya visited Shraddha walkar family) घेतली.

प्रतिक्रिया देताना किरीट सोमैय्या


लवकर निकाल :श्रद्धाच्या वडिलांसोबत या गुन्ह्याच्या संदर्भात खोलवर चर्चा झाली. तसेच हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवून गुन्ह्याचा लवकरात लवकर निकाल लागावा, यामागील खरा हेतू काय आहे ? याच्या मागे आणखी कोणी आहे का ? याबाबतीत श्रद्धाच्या कुटुंबाला चिंता असल्याची माहिती सोमैय्या यांनी उपस्थित पत्रकारांना (Shraddha walkar family in Vasai) दिली.

कडक कारवाईची मागणी : तिच्या वडिलांना मुलगी गेल्याचे दुःख आहे. अजून त्या धक्यातून ते बाहेर आलेले नाही. त्यांच्या परिवारासोबत दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही के सक्सेना यांच्यासोबत बोलणे करून दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्यासोबत या गुन्ह्यासंदर्भात फोनवर माझी चर्चा झाली आहे. या प्रकरणांवर स्वतः मी जातीने लक्ष घालून या हत्येमागे हेतू काय आहे ? याव्यतिरिक्त आणखी काही आहे का ? अश्या प्रकारचे वातावरण का तयार झाले ? याचाही शोध तपास यंत्रणेने घ्यावा, याच्यामागे कोणी असेल तर त्याच्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमैय्या यांनी केली (Shradda Murder Case) आहे.

प्रकरणाचा तपास सुरू :श्रध्दा वालकरच्या निर्घृण हत्याप्रकरणात दिल्ली पोलिसांनी सोमवारी तीन जणांचे जबाब नोंदवले. श्रध्दाला २०२० मध्ये झालेल्या मारहाणीसंदर्भात हे जबाब नोंदविण्यात आले. या प्रकरणाचा तपास करून पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलीस सलग चौथ्या दिवशी वसईत तळ ठोकून आहे. आफताबने २०२० मध्ये श्रध्दाला मारहाण केली होती. त्यावेळी श्रद्धा तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असताना पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणी करून पुन्हा दाखल करण्यास सांगितला.

जबाब नोंदवले :मात्र तिने वैद्यकीय तपासणी न करता तक्रार दाखल केली नाही. मात्र, तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या अदखलपात्र यांची प्रत मिळाली असून त्या आधारावर दिल्ली पोलीस तपास करत आहेत. ती नालासोपारा येथील ओझॉन रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या मदतीने तिने पोलीसात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ओझॉन रुग्णालयाचे डॉ शिवप्रसाद शिंदे, तसेच समाजिक कार्यकर्त्या पूनम बिडलान यांचे जबाब नोंदवले. श्रध्दा आणि आफताब नायगाव येथील एका इमारतीत भाड्याच्या सदनिकेत रहात होते. त्याच्या मालकाचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.

Last Updated : Nov 22, 2022, 7:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details