महाराष्ट्र

maharashtra

IT Raids : प्रसिध्द बिल्डर हिरानंदानींच्या कार्यालयावर आयकर विभागाची मोठी छापेमारी

By

Published : Mar 22, 2022, 2:09 PM IST

Updated : Mar 22, 2022, 2:25 PM IST

ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट (Hiranandani Estate in Thane) येथील हिरानंदानी बिल्डरच्या (Hiranandani Builder) कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाची छापेमारी (Income tax department raids ) सुरू झाली आहे.हिरानंदानीं ग्रुपच्या तीन शहरातील 24 ठिकाणांवर ही कारवाई सुरू आहे.

Hiranandani Estate in Thane

मुंबई: आयकर विभागाच्या पथकाने आज सुप्रसिद्ध बिल्डर हिरानंदानी ग्रुपच्या 24 ठिकाणी छापे टाकले. मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू येथे हे छापे सुरू आहेत. ग्रुपच्या संचालकांच्या ठिकाणांवरही कारवाई सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून हे छापे टाकण्यात येत आहेत. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे अनेक नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. अशा स्थितीत हा छापा पडला आहे. त्याचवेळी एक टीम कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडमध्ये पोहोचली आहे.

Hiranandani Estate in Thane
Last Updated : Mar 22, 2022, 2:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details