महाराष्ट्र

maharashtra

Chandrasekhar Bawankule : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे - चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Dec 19, 2022, 9:18 AM IST

नागपुरात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी (for Development of Maharashtra) फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री व्हावे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान केले. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय अतिशय जड अंत:करणाने घेतला असेही, ते म्हणाले. महाराष्ट्राचे भविष्य जर कोणी ठरवू शकत असेल तर ते देवेंद्रजी आहेत, असेही ते (Chandrasekhar Bawankule statement in Nagpur) म्हणाले.

Chandrasekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrasekhar Bawankule) रविवारी असे सुचवले आहे की, जोपर्यंत ते पक्षाच्या राज्य युनिटचे नेतृत्व करत आहेत. तोपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री (Development of Maharashtra Devendra Fadnavis) व्हावे. त्यांच्या विधानाचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

वाक्य अपूर्ण : बावनकुळे यांच्या विधानाने राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांना आयते कोलीत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने असे म्हटले होते की, भारतीय जनता पक्षाला विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी किंमत नाही. नागपुरात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना बावनकुळे म्हणाले, मी जोपर्यंत (भाजपचा) प्रदेशाध्यक्ष आहे, तोपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री व्हायला (for Development of Maharashtra) हवे.

कार्यकर्त्याचे कर्तव्य :श्रोत्यांपैकी काही जणांनी 'मुख्यमंत्री' असा जयघोष केल्यावर बावनकुळे आपले भाषण चालू ठेवत म्हणाले. फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम केले पाहिजे. ते पद महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. महाराष्ट्राचे भविष्य जर कोणी ठरवू शकत असेल तर ते देवेंद्रजी आहेत. ते फडणवीस यांच्या उपस्थितीत बोलत होते. बावनकुळे म्हणाले की, 2014-19 च्या कालखंडात, जेव्हा त्यांनी राज्य सरकारचे नेतृत्व केले, तेव्हा ते परत आले पाहिजेत, याची खात्री करणे हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य (Chandrasekhar Bawankule statement in Nagpur) आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ : बावनकुळे (CM BJP chief Chandrasekhar Bawankule) म्हणाले, फडणवीस यांना राज्यातील सर्वोच्च पदावर नेण्यासाठी सर्व समाजातील लोकांनी एकत्र आले पाहिजे. महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने 30 जून रोजी सेनेला फाटा देणारे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडणारे शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केल्यावर आश्चर्य व्यक्त केले. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 शिवसेना आमदारांच्या गटाने केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी अपेक्षा होती. मात्र नवीन सरकारचे नेतृत्व शिंदेच करणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी सुरुवातीला सरकारबाहेर राहणार असल्याचे सांगितले होते, परंतु काही तासांतच भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले.

भाजपकडून फसवणूक :काही दिवसांनंतर, चंद्रकांत पाटील, जे त्यावेळी भाजपच्या राज्य युनिटचे नेतृत्व करत होते ते म्हणाले, आम्हाला योग्य संदेश देणारा आणि स्थिरता सुनिश्चित करणारा नेता देण्याची गरज आहे. केंद्रीय नेतृत्व आणि देवेंद्रजींनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. जड अंतःकरणाने मुख्यमंत्री म्हणून...आम्ही नाखूष होतो, पण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. बावनकुळे हे या वर्षी ऑगस्टमध्ये पक्षाचे राज्य प्रमुख झाले. बावनकुळे यांच्या विधानाला उत्तर देताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले होते की, याचा अर्थ भाजप नेत्यांना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला शून्य किंमत आहे. लवकरच, त्यांना भाजपकडून फसवणूक झाल्याचे लक्षात (Devendra Fadnavis should become CM) येईल.

सरकार टिकणार नाही : ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच असेच विधान केले होते की, फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनताना पाहणे भाजप नेत्यांना वेदनादायक होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट करून बावनकुळे भाजप अध्यक्षपदाच्या कार्यकाळात फडणवीस यांना मुख्यमंत्री कसे करणार, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एक दिवस आधी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते की, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत टिकणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details