महाराष्ट्र

maharashtra

राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल, आज बारावीचा निकाल; ईटीव्ही भारत टॉप न्यूज

By

Published : Aug 3, 2021, 6:56 AM IST

Updated : Aug 3, 2021, 8:25 AM IST

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

ETV BHARAT MARATHI TOP NEWS
ईटीव्ही भारत टॉप न्यूज

  • आज दिवसभरात/आजपासून -

Break The Chain : राज्यातील लॉकडाऊन शिथील, मात्र ११ जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम कायम

मुंबई - कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यामुळे राज्यातील २५ जिह्यांची निर्बंधांतून मुक्तता करण्यात आली. येथील दुकाने आठ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर ११ जिल्ह्यांमधील रुग्ण संख्या लक्षात घेत, नियमावली कायम ठेवली आहे. सर्व सामान्यांच्या लोकल प्रवासाचा मार्ग मात्र बंद ठेवण्यात आला आहे, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी केला असून रात्रीपासून ही नियमावली लागू होईल, असे त्यात नमूद केले आहे. वाचा सविस्तर -

12th Result : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, 'या' वेबसाईट्सवर बघा तुमचा निकाल

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या १२ वीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उद्या (3 ऑगस्ट) दुपारी १२ वीचा निकाल जाहीर होणार, असे स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे. वाचा सविस्तर -

VIDEO : कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर पाहा, आजचे राशीभविष्य. पाहा व्हिडिओ

  • कालच्या टॉप न्यूज -

आमदार लाड म्हणाले सेनाभवन फोडू: मुख्यमंत्र्यांचा 'थापड' मारण्याचा इशारा, मग कायदा सुव्यवस्था राखायची कोणी?

मुंबई -भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वेळ पडल्यास शिवसेना भवन फोडण्याचे वक्तव्य केल्याने भाजप आणि शिवसेनेत वाद उभा राहिला आहे. त्या वादात आता संजय राऊत आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उडी घेतल्याने चांगलेच राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत थापड देण्याचा विरोधकांना इशारा दिला आहे. या इशाऱ्यातून त्यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरण्याचे काम केल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जवाबदारी असणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच असा 'थापड' मारण्याचा इशारा दिल्याने राजकीय विश्लेषक आश्चर्य व्यक्त करत आहेत. वाचा सविस्तर -

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ई-रुपी लाँच, जाणून घ्या, डिजीटल देयकाबाबतची सविस्तर माहिती

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल देयक व्यवहाराला चालना देण्याकरिता ई-रुपी लाँच केले आहे. हे ईलेक्ट्रॉनिक व्हाउचर पेमेंट सोल्यूशन आहे. हे केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी लाभार्थ्यांना सोडेक्सो कूपनसारखे वापरता येते. त्यामुळे ई-रुपीसाठी इंटरनेट किंवा पेमेंट अॅपची गरज नाही. वाचा सविस्तर -

महाराष्ट्र कोरोना अपडेट - रुग्ण, मृत्यूसंख्या घटली; ४ हजार ८६९ नवे रुग्ण, ९० रुग्णांचा मृत्यू

मुंबई- राज्यात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ६,९५९ रुग्णांची शनिवारी नोंद झाली होती. त्यात रविवारी किंचित घट होऊन ६,४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यात सोमवारी आणखी घट होऊन ४,८६९ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात गुरुवारी १९०, शुक्रवारी २३१, शनिवारी २२५, रविवारी १५७ मृत्यूची नोंद झाली. सोमवारी त्यात घट होऊन ९० मृत्यूची नोंद झाली. वाचा सविस्तर -

#JeendeDo गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वचस्तरातून टीका, जाणून घ्या, प्रतिक्रिया

पणजी- दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर देशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बाहेर फिरायला जाणाऱ्या मुलींबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर सर्वस्तरातून टीका करण्यात येत आहे. वाचा सविस्तर -

जगाचा निरोप घेतल्यावर 'ते' अडकले विवाहाच्या पवित्र बंधनात; नेमकं 'काय' घडलं वाचा...

जळगाव -एकाच समाजातील तरुण आणि तरुणीचे एकमेकांवर प्रेम जडले. प्रेमाच्या आणाभाका घेताना त्यांनी जन्माजन्माचे साथी होण्याची स्वप्ने पाहिली. पण समाज आणि कुटुंबीय आपल्या प्रेमाला मान्यता देणार नाहीत, अशी समजूत करून घेत दोघांनी एकाच दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शेवटी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावले. हा प्रसंग एखाद्या चित्रपटाचे कथानक नाही, तर जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे गावात घडलेली ही हृदयद्रावक घटना आहे. वाचा सविस्तर -

  • ईटीव्ही भारत एक्सक्लूसिव्ह -

ऑगस्टमध्ये या '5' औषधी कंपन्यांचे शेअर बाजारात येणार आयपीओ, 8 हजार कोटींचा निधी जमण्याची अपेक्षा

Zika Virus : 'झिका व्हायरस'चा प्रादुर्भाव कसा रोखाल ? सांगत आहेत डॉ. प्रदीप आवटे

  • अधिक बातम्यांसाठी लॉग इन करा -

https://www.etvbharat.com/marathi/maharashtra

Last Updated : Aug 3, 2021, 8:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details