ETV Bharat / bharat

#JeendeDo गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वचस्तरातून टीका, जाणून घ्या, प्रतिक्रिया

author img

By

Published : Aug 2, 2021, 7:42 PM IST

पर्यटनासाठी देशातील सर्वात प्रसिद्ध असलेले गोवा सध्या हे कायदा व सुव्यवस्थेमुळे चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्यानंतर पालकांबाबतच प्रश्न उपस्थित केले होते. गोव्यामध्ये काय घडले ? मुख्यमंत्र्यानी काय विधान केले ? त्यांच्याबाबत महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत ? जाणून घ्या, सविस्तर माहिती.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वचस्तरातून टीका
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वचस्तरातून टीका

पणजी - दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर देशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बाहेर फिरायला जाणाऱ्या मुलींबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर सर्वस्तरातून टीका करण्यात येत आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी विधानसभेत वादग्रस्त विधान केले. रात्रीच्या वेळी मुली समुद्रकिनारी फिरत असतील तर त्यांच्या पालकांनी आत्मपरीक्षण करावे, असे मुख्यमंत्री सावंत विधानसभेत म्हणाले होते. त्यावरून विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. गोव्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे गोवा काँग्रेसचे प्रवक्ते अल्टोन डी कॉस्टा यांनी गुरुवारी सांगितले. पुढे ते म्हणाले, की आम्ही रात्री फिरण्यासाठी का घाबरावे? गुन्हेगारांनी तुरुंगात असायला पाहिजे. तर कायद्याचे पालन करणाऱ्या ग्राहकांनी मुक्तपणे बाहेर फिरले पाहिजे.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वचस्तरातून टीका

गोव्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह-

गोवा महिला काँग्रेसने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. गोवा महिला काँग्रेसचे अध्यक्ष वीणा नाईक म्हणाल्या, की गोवा शांतीप्रिय राज्य आहे. मात्र, जेव्हापासून राज्यात भाजप सरकार आले आहे, तोपर्यंत गोव्यात भीतीचे वातावरण आहे. राज्यातील गुन्हेगार हे बिनधास्तपणे गुन्हे करत आहेत.

आम आदमी पक्षाच्या नेत्या अनुराधा गावडे म्हणाल्या, की आठवड्याला महिलांच्या विरोधात केलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण 4 टक्के आहे. गोव्यातील महिलांच्या सुरक्षेकरिता कायदा नाही का ? गोव्यातील महिला सुरक्षित नाहीत का ? असा गावडे यांनी प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा-कास्टिंग काऊच प्रकरण : नवोदित अभिनेत्रीने सांगितला 'त्या' दिवशीचा थरारक अनुभव

प्रमोद सावंत काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की आपण पोलिसांना थेट दोष देतो. मात्र, 10 तरुणी या समुद्रकिनारी पार्टी करण्यासाठी जातात. त्यामधील चार तरुणी रात्रभर समुद्रकिनारी राहतात. तर सहा तरुणी घरी परतात. मुद्रकिनाऱ्यावर दोन मुले आणि मुली रात्रभर होते. लहान मुलांनी विशेषत: अल्पवयीन मुलांनी समुद्रकिनारी वेळ घालवू नये. चारही आरोपींना अटक केल्याचा मुख्यमंत्री सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ई-रुपी लाँच, जाणून घ्या, डिजीटल देयकाबाबतची सविस्तर माहिती

वादग्रस्त विधान कामकाजातून वगळले..

दरम्यान, दोन मुलींवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात चार आरोपी आहेत. तर एक सरकारी कर्मचारी आहे. सरकारी कर्मचाऱ्याने पोलीस असल्याचे सांगून दोन मुलींवर बलात्कार केला. विधानसभा अध्यक्ष राजेश पाटनेकर यांनी वादग्रस्त विधान हे सभागृहाच्या कामकाजामधून वगळले आहे.

हेही वाचा-E RUPI पंतप्रधानांनी लाँच केले डिजीटल रोकडविरहित नवे माध्यम

नोकरी करणाऱ्या महिलांकडूनही प्रश्न उपस्थित

गोव्यामधील कायदा व सुव्यवस्ता आणि मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानानंतर नोकरी करणाऱ्या महिलांनीही नाराजी व्यक्त केली आहे. प्रतिभा बोरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वच गुन्हेगारांमध्ये कायद्याचे भय असायला हवे. गृहमंत्र्यांच्या नात्याने गोव्याच्या कायदा व सुव्यवस्थेची मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी आहे. त्यांच्यावर नैतिक जबाबदारी आहे.

गोव्यात सात महिन्यात महिला अत्याचाराच्या 153 घटना -

२५ जुलैला गोव्याच्या बेनॉलिम बीचवर १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर गोव्यात महिल्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून रणकंदन माजले होते. दरम्यान मागील काही महिन्यांचा गोव्यातील महिला अत्याचारांच्या घटनाचा आलेख पाहिला तर तो उंचावत असल्याचे दिसून येते. 2021 च्या सुरुवातीपासून म्हणजेच मागील सात महिन्यात गोव्यात महिला अत्याचाराच्या 153 घटना घडल्या आहेत.

काय म्हणतात गोव्यात येणारे पर्यटक ?

गोवा हे देशासह जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये महिलांचेही प्रमाण जादा आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या विधानाबद्दल पर्यटकांमध्ये नाराजी आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीशीर सुरक्षा मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. सुरक्षेचा मुद्दा हा सर्वात महत्त्वाचा असल्याचे पर्यटकांना वाटते. कायदा सुव्यवस्थेची राज्य सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहे. जेणेकरून महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांवर नियंत्रण करणे शक्य होईल. असे झाले तर गोव्यात भीती न बाळगता फिरणे शक्य होईल, अशी भावना पर्यटक व्यक्त करतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.