महाराष्ट्र

maharashtra

Chitra Wagh Controversial Tweet : ट्विटरद्वारे चुकीची माहिती दिल्यामुळे भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ अडचणीत

By

Published : Jan 23, 2023, 5:02 PM IST

रत्नागिरी येथील प्रसिद्ध पतितपावन मंदिराच्या उभारणीबाबत ट्विटरद्वारे चुकीची माहिती दिल्यामुळे भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ अडचणीत आल्या आहेत. २५ नोव्हेंबर रोजी चित्रा वाघ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत या मंदिराला भेट दिली होती.

Chitra Wagh Controversial Tweet
चित्रा वाघ पतीत पावन मंदिरात दर्शन घेताना

मुंबई :भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत गेल्या २५ नोव्हेंबर रोजी वाघ यांनी या मंदिराला भेट दिली. त्यानंतर उत्साहाच्या भरात केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधलेल्या पतितपावन मंदिरात जाऊन पूजा केल्याचे नमूद केले. अशा प्रकारे चुकीची माहिती देऊन भागोजीशेठ कीर यांचे कार्य नष्ट करण्याचा प्रयत्न वाघ यांनी केला. गेल्या शतकातील दानशूर समाजसेवक भागोजीशेठ कीर यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सूचनेनुसार ही वास्तू बांधली आहे. म्हणून त्यांनी माफी मागावी; अन्यथा रत्नागिरीत फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी दिला आहे.

चुकीची माहिती असेलेले चित्रा वाघ यांचे ट्विट


काय होते ट्विट :स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या प्रसिद्ध पतित पावन मंदिरात मनोभावे पूजा केली. 'प्रत्येक व्यक्तीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन परमेश्वराला स्पर्श करून पूजा करण्याचा हक्क व अधिकार देणारे भारतातील पहिले मंदिर', असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले होते.



चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवावा :या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत शेट्ये यांच्यासह काँग्रेसचे हारिस शेकासन, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, काँग्रेसच्या रुपाली सावंत इत्यादींनी सांगितले की, वाघ यांनी स्वातंत्र्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न रत्नागिरीत येऊन केला आहे. तशा आशयाचा फलक पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेला असतानासुध्दा हा खरा इतिहास न वाचता त्याची मोडतोड करून खोटा इतिहास पसरवून लोकांच्या भावना दुखावण्याचे काम केले. म्हणून त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी या नेत्यांनी केली आहे.

चित्रा वाघ या वादामुळे चर्चेत :चित्रा वाघ यांच्यामागील वादाचा ससेमिरा काही थांबण्याची लक्षणे काही दिसत नाही. अभिनेत्री उर्फी जावेदवर कपड्याच्या वादावरून केलेली टीका सर्वश्रुत आहे. उर्फी जावेद साठी माझ्याकडे येत असाल तर येऊ नका, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी 15 जानेवारी, 2023 रोजी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. माझ्या मुलांचे फोटो सोशल मीडियावरून फिरवण्यात आले, काय सिद्ध केले. आमची फक्त इतकी मागणी होती की, तिला जे काही करायचं ते सार्वजनिक ठिकाणी करू नये. एकट्यात बंद घरात काय करायचं ते तिने करावं. तिचा नंगा नाच आम्ही सहन करणार नाही, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी टीका केली होती.

वाघ यांची उर्फीवर खरमरीत टीका : उर्फी जावेदला काय माहिती काय भीती वाटते. संविधानाने दिलेले अधिकार आहे मला माहिती आहे. मात्र, त्यासाठी तिने काहीतरी घालायला पाहिजे. उघड नागड रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी नागडे चाळे करणार हे चालणार नाही. तुझ्या स्टुडिओत, घरात काय करते ते कर, पण बाहेर काही करू नकोस. कोणता धर्म सांगतो की बाई रस्त्यावर नागडी नाच. लोकांसाठी हे राजकारण मात्र माझ्यासाठी हा संस्कृतीचा प्रश्न. मी वकील नाही, पण मला माहित आहे काय कायद्याची तरतूद आहे ते, माझा मॅसेज खूप स्ट्रॉंग आहे. सरकार सरकारचे काम करेल, पोलीस पोलिसाचे काम करेल, आम्ही आमचे काम करू. नंगा नाच मुंबईत रोखला नाही; तर औरंगाबादच्या चौकात हे नाच होतील, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती.

हेही वाचा: महाराष्ट्रात सध्या वैचारिक प्रदूषण, लोकशाही टिकविण्यासाठी आम्ही एकत्र - उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांची युतीची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details