महाराष्ट्र

maharashtra

गणेशोत्सव कोरोनाचे निर्बंध पाळून साजरा करा - आरोग्यमंत्री

By

Published : Sep 7, 2021, 3:48 PM IST

Updated : Sep 7, 2021, 6:02 PM IST

केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळ राज्यात नुकत्याच पार पडलेल्या सणांमुळे रुग्णांच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातही सण आणि उत्सव साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना काही सूचना केल्या आहेत. त्यानुसारच राज्याने निर्बंध ठेवले आहेत. सण व उत्सवांमुळे गर्दी वाढल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

c
c

मुंबई- गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळण्याचे आरोग्य मंत्र्यांकडून आवाहन करण्यात आले आहे. सध्या तरी राज्यात निर्बंध वाढविण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चर्चा केलेली नाही. मात्र, निर्बंध वाढवण्याची गरज लागल्यास याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

बोलताना आरोग्यमंत्री

दोन दिवसांवर गणेशोत्सव सण आला आहे. गणेशोत्सव सण साजरा करत असताना राज्यातील जनतेने कोरोनाचे सर्व नियम पाळून, सण साजरा करावा, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. सण, उत्सवात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली असून, राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भीती आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तसेच राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही कोरोनाचे निर्बंध पाळावे, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. सध्या तरी राज्यात निर्बंध वाढविण्यासंदर्भात कोणतीही चर्चा नाही. नागपूर किंवा इतर राजा संदर्भात मुख्यमंत्री व आरोग्य विभाग लक्ष रुग्णसंख्या वाढीवर लक्ष ठेवून आहे. मात्र, निर्बंध वाढविण्यासंदर्भात मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असेही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले.

केंद्राकडून सूचना देण्यात आल्या आहेत

केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळ राज्यात नुकत्याच पार पडलेल्या सणांमुळे रुग्णांच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातही सण आणि उत्सव साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना काही सूचना केल्या आहेत. त्यानुसारच राज्याने निर्बंध ठेवले आहेत. सण व उत्सवांमुळे गर्दी वाढल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले.

चार ते पाच जिल्ह्यात अधिक रुग्ण वाढ

गेल्या काही दिवसांपासून राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अहमदनगर, सातारा, पुणे, रत्नागिरी आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये एकूण रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे लसीकरण वाढवण्यावर राज्य सरकारचा भर आहे. दिवसाला संपूर्ण राज्यामध्ये 15 ते 20 लाख नागरिकांना लसीकरण करण्याची क्षमता राज्य सरकारची आहे. त्यामुळे सातत्याने केंद्राकडे लसीचा साठा वाढवून देण्याबाबत मागणी केल्याचे यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वाढवण्यावर भर

राज्यात आता 1 हजार 400 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून 450 पीएसए प्लांट तयार करण्यात आले आहेत. यापैकी 250 प्लांट लवकरच सुरू होतील. हे नवीन प्लांट सुरू झाल्यानंतर राज्याच्या ऑक्सीजन क्षमतेत वाढ होईल. आता राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता 1 हजार 400 मेट्रिक टन आहे. ही उत्पादन क्षमता दोन हजार मेट्रिक टनपर्यंत नेण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचेही यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून तिसऱ्याला त्यानंतर रुग्णांची जी अंदाजे आकडेवारी सांगितली जाते. त्यानुसार ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज पडणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत गणेश मंडळांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये मुंबईतील गणपतींचं ऑनलाईन दर्शन फक्त देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त आहे. म्हणजेच यंदा मुंबईतील गणेशभक्तांना लालबागमधील सार्वजनिक मंडळांचे गणपती पाहता येणार नाही. असे झाल्यास गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये होणारी गर्दी कमी होईल. त्यामुळे कोरानाचा फैलाव होणार नाही, असे सांगितले जात आहे.

हेही वाचा -मोदी एक्स्प्रेस कोकणाकडे रवाना, दादर स्थानकातून ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा

Last Updated : Sep 7, 2021, 6:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details