महाराष्ट्र

maharashtra

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सीबीआयचा झटका, मुलगी अन् सुनेवर आरोपपत्र; काय आहे प्रकरण?

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 10:58 AM IST

CBI Clean Chit Report Leak : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना सीबीआयनं मोठा धक्का दिला आहे. सीबीआय अहवाल लीक प्रकरणात अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत यांच्यावर आरोपपत्र यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

Anil Dshmukh
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख

मुंबई CBI Clean Chit Report Leak :माजी मंत्री अनिल देशमुख यांना ‘क्लीन चिट’ दिल्याचा अहवाल कथितरित्या लीक केल्याप्रकरणी देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत यांच्याविरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलंय. संस्थेनं 2021 मध्ये सादर केलेल्या अंतर्गत अहवालात ही क्लीन चिट दिली, अशी माहिती त्यावेळी समाज माध्यमांमध्ये प्रसृत झाली होती.

आरोपपत्रात काय म्हंटलंय :29 ऑगस्ट 2021 रोजी सीबीआयचा अहवाल माध्यमांमधून लीक झाला होता. त्यामुळं या प्रकरणी पूजा आणि राहत यांच्याविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. दरम्यान, सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून त्यात पूजा आणि राहत यांच्यावर कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय. पूजा अन् राहत यांनी हा अहवाल मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागासोबत कट रचला. त्यांनी डागा यांच्या प्रवासाची सोय केली. त्याद्वारेच डागा यांनी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देऊन त्यांच्याकडून या अहवालाचा मसुदा मिळवलाय, असं आरोपपत्रात म्हटलंय.

दरम्यान, सोमवारी (20 नोव्हेंबर) दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रात पूजा आणि राहत यांच्यासह अनिल देशमुख यांचा दूरचा नातेवाईक विक्रम देशमुख आणि सत्यजीत वायाळ नामक व्यक्तीचाही समावेश आहे.

काय आहे नेमकं प्रकरण :मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर मुंबईतील बार अन् रेस्टॉरंटकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं चौकशीचे आदेश दिले होते. तसंच त्यासंदर्भातील अहवालही तयार करण्यात आला. मात्र, हा अहवाल अनिल देशमुख यांची मुलगी पूजा हिनं लीक केल्याचा आरोप आहे. त्या अहवालात अनिल देशमुख यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असं नमूद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. तसंच याच प्रकरणात सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील डागा यांना अटकही झाली होती.

हेही वाचा -

  1. Maratha Quota Violence : देवेंद्र फडणवीस यांच्याच आदेशानं मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, अनिल देशमुखांचा पुन्हा हल्लाबोल
  2. Anil Deshmukh News: निवडणुका तोंडावर असल्या की मोठ्या दंगली घडवून त्याचा राजकीय फायदा घेतला जातो- अनिल देशमुख
  3. Maharashtra Political Crisis: अनेक आमदारांना परत यायचे आहे; दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल - आ. अनिल देशमुख

ABOUT THE AUTHOR

...view details