महाराष्ट्र

maharashtra

Speed Railway Station: वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हायस्पीड रेल्वे स्टेशनचे डिझाइन, बांधकाम बाबत बोली मुदत वाढवली

By

Published : Oct 28, 2022, 7:25 PM IST

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra Kurla Complex) हायस्पीड रेल्वे स्टेशनचे ( Bandra Kurla Complex High Speed Railway Station) डिझाइन तसेच बांधकामा बाबत बोली करण्यासाठीची मुदत वाढवण्यात (Bid deadline extended for design construction) आली आहे. यासाठी आता संबंधितांना 3 नोव्हेंबर पर्यन्त अर्ज करता येणार आहेत.

High Speed ​​Railway
हायस्पीड रेल्वे

मुंबई :केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेन साठी मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुल येथे भुयारी रेल्वे स्थानक उभारल्या जाणार आहे या रेल्वे स्थानकाच्या साठी आता राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे महामंडळाच्या वतीने बोली लावणे आणि निविदा संदर्भातल्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या संदर्भात नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्या सुषमा गौरी यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले की, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हायस्पीड रेल्वे स्टेशनचे डिझाइन आणि बांधकाम बाबत बोली मुदत 3 नोव्हेंबर पर्यन्त वाढवली गेली आहे.आता 3 नोव्हेंबर पर्यन्त संबंधित संस्थांना अर्ज करता येणार आहेत. 4 नोव्हेंबर रोजी तांत्रिक निविदा उघड केल्या जातील.

ABOUT THE AUTHOR

...view details