महाराष्ट्र

maharashtra

Bhutan King Meet With Maha CM : भूतानचे राजे मुंबई भेटीवर; राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

By ANI

Published : Nov 8, 2023, 8:20 AM IST

Updated : Nov 8, 2023, 12:34 PM IST

Bhutan King Meet With Maha CM : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी मुंबईत भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर संबंध दृढ करण्यावर भर दिला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांना छत्रपती शिवजी महाराज आणि गणपतीची मूर्ती भेट दिली.

Bhutan King Meet With Maha CM
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई Bhutan King Meet With Maha CM :भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे भारत भेटीवर आले आहेत. मंगळवारी त्यांनी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करुन त्यांना गणपती बाप्पा आणि महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवराय यांची मूर्ती भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली.

भारत आणि भूतानमध्ये सांस्कृतिक समानता :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी भारत आणि भूतानमध्ये अनेक सांस्कृतिक आणि पारंपारिक समानता आहेत. या दोन्ही देशात विविध क्षेत्रात एकमेकांच्या मदतीनं द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. दोन्ही देशाच्या द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्व सहकार्य करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही घेतली भेट :भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Bhutan King Meet With Pm Narendra Modi)यांचीहीभेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध विषयावर चर्चा केली. प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे 3 ते 10 नोव्हेंबर या कालावधीसाठी भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत. नवी दिल्लीत येण्यापूर्वी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी आसामलाही भेट दिली आहे.

भूतानच्या राजांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक :भारतानं नुकतचं जी20 शिखर परिषदेचं आयोजन केलं होतं. या आयोजनावरुन भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी भारताचं आणि पंतप्रधन नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. जी 20 परिषदेत घेण्यात आलेले रचनात्मक निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं. भारतानं दक्षिणेतील देशांचं हित आणि दिलेलं प्राधान्य याबद्दल त्यांनी भारताची प्रशंसा केली.

भारत आणि भूतान यांच्यात मैत्री :भारत आणि भूतान यांच्यात मैत्री आणि सहकार्याचं अनोखं नातं आहे. हे नातं विश्वासानं जपलं जात आहे. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या भेटीमुळे हे नातं आणखी दृढ होणार आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांना द्वीपक्षीय सहकार्याच्या कार्याचा आढावा घेता येईल. त्यामुळे ही मैत्री अशीच कायम ठेवण्यास मदत होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. भूतानचे माजी पंतप्रधान देणार आयआयटीच्या 'टेकफेस्ट'मध्ये पर्यावरण संवर्धनाचे धडे
  2. नरेंद्र मोदींनी फिरवला भूतानच्या खासदाराच्या टकलावरून हात, पाहा व्हिडिओ
  3. Deepika Padukone in Bhutan : दीपिका पदुकोणने शेअर केले भूतान सहलीचे सुंदर फोटो
Last Updated :Nov 8, 2023, 12:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details