ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदींचा भूतान दौरा संपला; भूतानच्या पंतप्रधानांचं डोकलाम वादावर मोठं विधान

author img

By

Published : Aug 18, 2019, 6:24 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौर्‍यावरुन परतले आहेत. परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. दरम्यान भूतानचे पंतप्रधान लोते तेशरिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भेटीबद्दल आभार मानले असून डोकलाम वादावर एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

नरेंद्र मोदींचा भूतान दौरा संपला

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौर्‍यावरुन परतले आहेत. परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. दरम्यान भूतानचे पंतप्रधान लोते तेशरिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भेटीबद्दल आभार मानले असून डोकलाम वादावर एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

  • Delhi: Prime Minister Narendra Modi returns from his two-day state visit to Bhutan. External Affairs Minister, Subrahmanyam Jaishankar receives him at the airport. pic.twitter.com/1NOdIJjyGR

    — ANI (@ANI) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


नरेंद्र मोदींनी भूतानला भेट दिल्याने आम्हाला आनंद झाला. ही एक यशस्वी भेट होती. आम्ही सर्वजण आनंदी आहोत. डोकलाम वादाबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नसून सर्व काही ठीक आहे. यावेळी डोकलाम या विषयावर कोणतीही चर्चा केली नाही. या वादावर तिन्ही देश (भारत, भूतान, चीन) सकारात्मक संवादाद्वारे निष्कर्षापर्यंत पोहोचतील, असे भूतानचे पंतप्रधान लोते तेशरिंग यांनी म्हटले आहे.

  • PM of Bhutan (Dr.) Lotay Tshering in Paro,Bhutan: We're very grateful to Govt of India for building a ground station (a part of India's South Asia Satellite) here. Through PM Modi's leadership, ISRO is willing to help us build human capacity in that. We are looking forward to it. https://t.co/01YSCk0lgF

    — ANI (@ANI) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


भूतानचे पंतप्रधान लोते तेशरिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दोन्ही देशांमधील राष्ट्रीय ज्ञानाचे नेटवर्क म्हणून काम करणाऱ्या ई-प्लेकचे अनावरण केले. याचबरोबर मोदींनी भूतानमध्ये रुपे कार्ड सुरू केले. दोन्ही देशादरम्यान एमओयूवर (सामंजस्य करार) सह्या झाल्या आहेत. तर भूतानकडून मोदींना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला आहे.


पंतप्रधान मोदींची ही दुसरी भूतान भेट आहे. यावेळी हजारो महिला, मुलांनी हातात तिरंगा घेत रस्त्याच्या कडेला उभे राहून मोदींचे स्वागत केले. याआधी भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांनी भूतानला भेट दिली होती

Intro:Body:

national


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.