ETV Bharat / entertainment

Deepika Padukone in Bhutan  : दीपिका पदुकोणने शेअर केले भूतान सहलीचे सुंदर फोटो

author img

By

Published : Apr 15, 2023, 6:13 PM IST

दीपिका पदुकोण काही दिवसापूर्वी आपल्या देशालगत असलेल्या भूतान देशात सुट्टी घालवून परतली आहे. यातील सुंदर फोटो पाहून अनेक चाहत्यांना उत्सुकता वाढली होती. आता दीपिकाने भूतान डायरीतील फोटो शेअर केले आहे.

दीपिका पदुकोणने शेअर केले भूतान सहलीचे सुंदर फोटो
दीपिका पदुकोणने शेअर केले भूतान सहलीचे सुंदर फोटो

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे भूतान भेटीतील फोटो या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांनंतर, दीपिकाने तिच्या अलीकडील सुट्टीतील फोटोंच्या स्ट्रिंगसह फॉलोअर्सना नवी ट्रिट दिली. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या छोट्या देशाला दीपिकाने भेट दिली.

निसर्गाच्या कुशीत रमलेली दीपिका - शनिवारी, दीपिकाने तिच्या भूतान सुट्टीतील फोटोंची मालिका इंस्टाग्रामवर शेअर गेली. अभिनेत्री दीपिकाने निसर्गाच्या कुशीत चांगला वेळ घालवला होता. लहान मुलांसोबत पोझ देण्यापासून ते जंगलात फेरफटका मारण्यापर्यंत आणि भूतानच्या सौंदर्यात भिजण्यापर्यंत, दीपिकाचे नवीन फोटो तुम्हाला तुमच्या बॅग पॅक करून सुट्टीसाठी जाण्यास भाग पाडतील. स्वच्छ मोकळी हवा, भरपूर ऑक्सीजन, निर्मळ पाण्याचे झरे, उंच डोंगर कपाऱ्या, नागमोडी वळणाचे सुंदर घाट, आकाशापर्यंत उंच मोहक शिखरे अशी दृष्ये या छोट्या देशात पाहायला मिळतात. भारता शेजारी असलेल्या इतर देशांपैकी हा एक सुंदर देश आहे. मुख्य म्हणजे यासाठी मोठ्या खर्चाचीही गरज नाही. मध्यमवर्गीयही आपल्या बजेटमध्ये इथे सहलीसाठी जाऊ शकतात.

स्थानिक मुलांसोबत दीपिका - दीपिकाने डझनभर फोटो शेअर केले आणि त्या सर्वांना 'लँड ऑफ द थंडर ड्रॅगन' असे कॅप्शन दिले. या फोटोपैकी, फक्त दोन फोटोमध्ये दीपिका दिसत आहे, परंतु चाहते कोणतीही तक्रार करत नाहीत कारण ती मेकअपशिवाय सुंदर दिसत आहे. एका फोटोत दीपिका एका खडकावर बसलेली दिसली आहे तर दुसरी ती हसत हसत देशी मुलांसोबत पोज देताना दिसत आहे.

दीपिकाची कामाची आघाडी - दरम्यान, वर्क फ्रंटवर, दीपिका शेवटची शाहरुख खानसोबत सुपरहिट हिट पठाणमध्ये दिसली होती. दीपिका यापुढे नाग अश्विन दिग्दर्शित साय-फाय ड्रामा प्रोजेक्ट के मध्ये दिसणार आहे ज्यात प्रभास आणि अमिताभ बच्चन आहेत. तिच्या चित्रपटांच्या लाइनअपमध्ये सिद्धार्थ आनंदचा एरियल अ‍ॅक्शनर फायटर हा हृतिक रोशनचा सहकलाकार आहे. हॉलिवूड चित्रपट द इंटर्नच्या हिंदी रीमेकसाठी देखील अभिनेत्री निर्माती म्हणून काम पाहाणार असून यात ती बिग बींसोबत पुन्हा एकत्र येणार आहे.

हेही वाचा - Shaakuntalam Box Office Collection: पाहा, सामंथा रुथ प्रभूच्या शाकुंतलमची पहिल्या दिवसाची कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.