महाराष्ट्र

maharashtra

Bhavna Gawli complaint : जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना नेत्यांविरोधात तक्रार

By

Published : Nov 23, 2022, 9:44 PM IST

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी ( Shinde Group MP Bhavna Gawli ) यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत ( Shiv Sena MP Vinayak ) यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. अकोल्याहून मुंबईकडे प्रवास करत असताना मंगळवारी रात्री अकोला रेल्वे स्थानकावर आमदार नितीन देशमुखसह ( MLA Nitin Deshmukh कार्यकर्तांनी माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केल्याचे त्या म्हणाल्या.

Bhavna Gawli
Bhavna Gawli

मुंबई -अकोल्याहून मुंबईकडे प्रवास करत असताना मंगळवारी रात्री अकोला रेल्वे स्थानकावर शिवसेनेचे खासदार विनायक ( Shiv Sena MP Vinayak ) आमदार नितीन देशमुख ( MLA Nitin Deshmukh ) हे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे आले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, नितीन देशमुख यांच्या चिथावणीवरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. असा आरोप शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी ( Shinde Group MP Bhavna Gawli ) यांनी केला आहे.

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना नेत्यांविरोधात तक्रार

मला जिवे मारण्याचाही प्रयत्न -माझ्याशी अत्यंत हींन वर्तणूक केली. तसेच मला जिवे मारण्याचाही प्रयत्न ( Bhavna Gawli complaint ) केला असा, आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे. यासंदर्भात आपण अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यां विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती दिली आहे.

महिला आयोगाकडे ही तक्रार दाखल करणार -यासंदर्भात आपण राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ( Home Minister Devendra Fadnavis ) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar ) यांच्याकडेही तक्रार दाखल करणार असल्याचे गवळी यांनी सांगितले.

ज्यांना घर सांभाळता आले नाही ते दुसरीकडे जाऊन काय करणार -माजी पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे ( Shiv Sena leader Aditya Thackeray ) यांनी बिहारमध्ये जाऊन तेजस्वी यादव यांची भेट घेतली आहे. या संदर्भात विचारले असता गवळी म्हणाल्या की ज्यांना घर सांभाळता आले नाही, महाराष्ट्र सांभाळता आला नाही ते दुसरीकडे जाऊन काय करणार असल्याचा उपरधीक टोला त्यांनी लगावाला.

ABOUT THE AUTHOR

...view details