महाराष्ट्र

maharashtra

मुंबई पोलीस फाउंडेशनला अक्षय कुमारकडून 2 कोटींची मदत

By

Published : Apr 27, 2020, 7:11 PM IST

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ट्विटरवरून माहिती देत अभिनेता अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.

मुंबई पोलीस फाउंडेशनला अक्षय कुमारकडून 2 कोटींची मदत
मुंबई पोलीस फाउंडेशनला अक्षय कुमारकडून 2 कोटींची मदत

मुंबई - बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याने मुंबई पोलीस फाऊंडेशनला 2 कोटींची मदत केली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईतल्या नागरिकांच्या सुरक्षेशासाठी 24 तास रस्त्यावर, गल्ली बोळात कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण होत आहे.

अशातच समाजाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या मदतीला पुढे येत सामाजिक बांधिलकी जपत अक्षय कुमार याने पोलीस फाऊंडेशनला 2 कोटींचे योगदान दिलें आहे. याबद्दल स्वतः मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ट्विटरवरून माहिती देत अभिनेता अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details