महाराष्ट्र

maharashtra

अभियंत्याला खड्ड्यात बसवून मनसेचे महामार्गावर 'झोपा काढो' आंदोलन

By

Published : Oct 8, 2020, 3:14 PM IST

Updated : Oct 8, 2020, 3:48 PM IST

लातूर-नांदेड रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यास खड्ड्यात बसवले व स्वतः दुसऱ्या खड्ड्यात झोपा काढो आंदोलन केले.

आंदोलक
आंदोलक

लातूर - सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन मनसेच्यावतीने आतापर्यंत आंदोलने करण्यात आली आहेत. लातूर- नांदेड या महामार्गाची मोठी दुरावस्था झाली आहे. तत्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यास चक्क खड्ड्यात बसवून ठेवले तर पदाधिकाऱ्यांनी 'झोपा काढो' आंदोलन केले.

आंदोलक

लातूर-नांदेड रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. गेल्या दिवसांपासून साधी डागडुजी देखील झालेली नाही. यातच सततच्या पावसामुळे वाहने मार्गस्थ होण्यास अडचणी येत आहेत तर अनेक लहान-मोठे अपघातही होत आहेत. यापूर्वीही मनसेच्या वतीने रास्तारोको करण्यात आला होता. मात्र, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनादरम्यान अभियंत्यासच बसवून ठेवण्यात आले तर मोठ्या खड्यांमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी झोपा काढल्या.

लातूर -नांदेड या दोन्ही जिल्ह्याच्या ठिकाणांना जोडणारा हा मुख्य मार्ग आहे. परंतु, सरकारचे दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे काम रखडलेले आहे. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाने यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत शेतकरी, सामान्य नागरिक यांचे प्रश्न घेऊन आंदोलने करण्यात आली आहेत. खड्यात बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन घेतल्यानंतरच मनसेने माघार घेतली. त्यामुळे आता तरी रस्त्याची दुरुस्ती होणार की नाही हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा -कृषी कायद्याला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून निलंग्यात आंदोलन

Last Updated : Oct 8, 2020, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details