महाराष्ट्र

maharashtra

कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिराचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'

By

Published : Jan 25, 2020, 5:06 PM IST

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिराचे आणि दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

कोल्हापूर- साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिराचे आणि दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुढच्या आठवड्यात त्याचे काम सुरू होणार असून मुंबईतील एका कंपनीकडून नाममात्र मानधनावर हे ऑडिट करण्यात येणार आहे.

अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिराचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'


स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजेच इमारत संरचना पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पुढाकार घेतला आहे. यातून मंदिराच्या बांधकामाची स्थिती, स्थिरता याबाबतची सद्यस्थिती समजणार आहे. विशेष म्हणजे अंबाबाईचे मंदिर सातव्या शतकातील असल्याचा उल्लेख आढळतो. ज्योतिबाचे मंदिर हे सतराव्या शतकात बांधले असल्याचा उल्लेख आढळतो. मंदिर संवर्धन करण्यासाठीही या अहवालाचा उपयोग होणार आहे. मंदिराची पडझड झालेला भाग आणि त्याची दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. तसेच मंदिराच शिल्पसौंदर्याचे सुद्धा आता जतन होणार आहे.

हेही वाचा - छत्रपती संभाजी महाराजांचा ३४० वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात

ABOUT THE AUTHOR

...view details