महाराष्ट्र

maharashtra

येडीयुरप्पांच्या 'त्या' विधानाला ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटलांनी दिले उत्तर, म्हणाले...

By

Published : Dec 30, 2019, 5:06 PM IST

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. ते त्यांच्या अधिकारात नसलेल्या घटकाबाबत बोलत असून अशा प्रकारच्या वक्तव्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अधिक वाढेल, असे प्रा. एन. डी. पाटील यांनी म्हटले.

Prof. N. D. Patil
प्रा. एन. डी. पाटील

कोल्हापूर -महाराष्ट्र कर्नाटक यांच्या सीमावादाचा प्रश्न अधिक चिघळत असल्याचे दिसत आहे. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी देखील ' महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही' असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार प्रा. एन. डी. पाटील यांनी घेतला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. ते त्यांच्या अधिकारात नसलेल्या घटकाबाबत बोलत आहेत, असे पाटील यांनी म्हटले.

प्रा. एन. डी. पाटील यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... औरंगाबादला दोन मंत्रिपदे; अब्दुल सत्तार अन् संदीपान भुमरेंची वर्णी

काय म्हणाले होते येडीयुरप्पा ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी, महाजन आयोगानुसार दोन राज्यातील सीमावाद संपलेला आहे. त्यामुळे सीमा वाद निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. तथापी आम्ही महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले होते. त्यांच्या त्या वक्तव्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा... अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री, पाहा संपूर्ण यादी

येडियुरप्पांना सीमावाद वाढवायचाय, म्हणून ते 'तशा' प्रकारची वक्तव्ये करत आहेत - पाटील

येडियुरप्पा यांचे विधान दुर्दैवी आहे. खरे तर येडियुरप्पा त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसलेल्या विषयाबाबत बोलत आहे. अशा प्रकारच्या वक्तव्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अधिक वाढेल, असे पाटील यांनी म्हटले. येडियुरप्पा हे आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. दोन्ही राज्यांच्या सीमावादाचा प्रश्न सोडवणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम असून तिथे हा निवाडा सुरू आहे. त्यासाठी आमचे 70 हजार पानांचे पुरावे तयार असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details