महाराष्ट्र

maharashtra

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना घुसखोरीची सवय - आमदार लोणीकर

By

Published : Jun 7, 2021, 8:23 PM IST

Updated : Jun 7, 2021, 9:18 PM IST

सध्याचे राज्य सरकार हे पांढऱ्या पायाचे सरकार आहे. आधी मराठा आरक्षण घालवले, त्यानंतर ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवले आहे. आता त्याच सरकारमधील मंत्री मराठा समाजासाठी आरक्षित केलेल्या वसतीगृहाची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासाठी वापरण्याच्या हालचाली सुरू केल्यात, असे आरोप भाजपचे परतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

छायाचित्र
छायाचित्र

जालना -राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करायची सवय आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठा समाजासाठी आरक्षित केलेल्या वसतीगृहात ते आता घुसले आहे, असा आरोप भाजपचे परतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

बोलताना आमदार लोणीकर

युती सरकारच्या काळात मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले. त्याचे फलित म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्याला मराठा मुला-मुलींसाठी वसतीगृह मंजूर केले होते. जालन्याचे तत्कालीन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची जागा अधिग्रहित केली होती. याच ठिकाणी आता विद्यमान पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तशी पाटीही लावली आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या आमदार बबनराव लोणीकर यांनी आज या विश्रामगृहाच्या ठिकाणी घोषणाबाजी करून सरकारला सज्जड दम दिला.

हे पांढऱ्या पायाचे सरकार आहे. मराठा आरक्षण घालविले, ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केले. आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर घाला घालत आहे. हे कदापि सहन करणार नाही, असा इशाराही आमदार लोणीकर यांनी सरकारला दिला आहे. आज सकाळी केलेल्या या आंदोलनाच्या वेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा -मोदी सरकारने जनतेचे 25 लाख कोटी रुपये लुटले, काँग्रेसचा आरोप

Last Updated : Jun 7, 2021, 9:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details