महाराष्ट्र

maharashtra

हिंगोली पोलिसांची कामगिरी, मोक्कातील आरोपींना उत्तर प्रदेशातून घेतले ताब्यात

By

Published : Mar 22, 2021, 9:37 PM IST

आरोपी विरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पथक त्यांचा शोध घेत होते. तर दोघे आरोपी महाराजगंज जिल्ह्यातील पुरंदरपूर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच तेथील स्थानिक पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत, महाराजगंज येथील न्यायालयासमोर हजर केले व दोन्ही आरोपींना हिंगोली येथे आणण्यात आले.

हिंगोली पोलिसांची कामगिरी, मोक्कातील आरोपीला उत्तर प्रदेशातून घेतले ताब्यात
हिंगोली पोलिसांची कामगिरी, मोक्कातील आरोपीला उत्तर प्रदेशातून घेतले ताब्यात

हिंगोली - जिल्हा पोलीस प्रशासन दिवसेंदिवस ऍक्टिव्ह मोडमध्ये आले असून वाढत्या कारवायांमुळे गुन्हेगारांची भंबेरी उडाली आहे. चक्क न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून फरार झालेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपींना उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील पुरंदरपूर येथुन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लक्ष्मण नागरे, भागवत बांगर अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही १५ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आरोपी हजर राहण्याऐवजी पळून गेले होते. आरोपी विरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पथक त्यांचा शोध घेत होते. तर दोघे आरोपी महाराजगंज जिल्ह्यातील पुरंदरपूर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच तेथील स्थानिक पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत, महाराजगंज येथील न्यायालयासमोर हजर केले व दोन्ही आरोपींना हिंगोली येथे आणण्यात आले.
2600 किमीचा प्रवास करून आरोपीला घेतले ताब्यात
दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथकाला तब्बल 2600 किमीचा प्रवास करावा लागल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपाअधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक केनेकर, मुजीब, असलंम, गारवे, बांगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details