महाराष्ट्र

maharashtra

रोपवाटिकेतून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल; हिंगोलीच्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा

By

Published : Dec 12, 2020, 1:09 PM IST

हिंगोली जिल्ह्यातील पानकनेरगाव येथील शेतकरी महादेव कुंडलीकराव जाधव हे रोपवाटिकेत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहेत. त्यांच्या रोपवाटिकेतील रोपांना खासकरून झेंडूच्या रोपांना मोठी मागणी आहे. या रोपवाटिकेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

hingoli farmer Earning big profit in the nursery
रोपवाटिकेतून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल; अनेकांनाही दिला रोजगार

हिंगोली- शेती म्हटलं की नुसती कट कट वाटून घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अजिबात कमी नाही. मात्र याच शेतीत कष्टाने सोनं पिकवणारे ही कमी नाहीत. याच उत्तम उदाहरण हिंगोली जिल्ह्यातील पानकनेरगाव येथे पाहायला मिळत आहे. एका तरुण शेतकऱ्यांने शेतीत लक्ष घालून पारंपरिक उभारलेल्या रोपवाटिकेत आधुनिक पध्दतीने रोपांची लावगड केली. विशेष म्हणजे या रोपांना प्रचंड मागणी येत आहे. यातून अनेकांना रोजगार तर मिळालाच याशिवाय तो शेतकरी वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहे.

महादेव कुंडलीकराव जाधव असे या तरुण शेतकऱ्यांच नाव आहे. जाधव यांच्याकडे पारंपरिक दहा एकर शेती आहे. दहा पैकी तीन एकरमध्ये त्यांच्या वडिलांनी 'माणकेश्वर' नावाने रोपवाटिका सुरू केली आहे. सुरुवातीला शेतात पारंपरिक पिके घेतली जायची. यातून ते मिरची टोमॅटोची रोपांची उगवण करून त्यांची विक्री करीत असत, त्यांनी विक्री केलेली रोपे चांगल्या दर्जाची असल्याने रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत गेली. त्यामुळे हळूहळू वेगवेगळ्या प्रकारची रोपे घेण्यास त्यांनी सुरुवात केली. अशात मागणीत वाढ झाली. यामुळे त्यांनी रोपांची संख्या वाढवली.

रोपवाटिकेतून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल...

वाफ्यावरील रोपे आता टिन शेडमध्ये
पूर्वी वडील वाफ्यामध्ये रोपे लावत असत माधवने त्यामध्ये थोडाफार बदल करून रोपे ट्रे मध्ये लावून त्यांना टीन शेडच्या जाळीमध्ये ठेवण्यास सुरुवात केली. जाळी घेण्यासाठी त्यांनी कृषी विभागाकडून मदत घेतली. रोपे लावण्याची पद्धत ही अतिशय नाजूक असून या कामाची सर्व जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नीवर दिली आहे. पत्नी ही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळत आहे. जवळपास आठ ते दहा महिला या ठिकाणी नेहमीच कामाला येतात. त्यांना बाराही महिने काम मिळत असल्याने त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटलेला आहे. याशिवाय इथे काही पुरुष मंडळी देखील कामाला आहेत.

ट्रे मधील रोपांना मागणी जास्त
पूर्वी जमिनीवर रोपे लावली जायची, मात्र महादेव यांनी यामध्ये थोडाफार बदल करून रोपे जमिनीवर आणि ट्रेमध्ये देखील लावण्यास सुरुवात केली. या रोपांना सर्वाधिक जास्त मागणी असल्यामुळे यातून जाधव यांना वर्षाकाठी कोट्यवधी रुपयाची उलाढाल होते. खर्च वजा जाता 20 ते 25 टक्के निवळ नफा मिळत असल्याचे जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

झेंडूच्या रोपांना सर्वाधिक मागणी
जाधव यांच्याकडे झेंडूच्या रोपांची सर्वाधिक जास्त मागणी असते. वेगवेगळ्या व्हरायटीचे झेंडूची रोपे उपलब्ध असल्यामुळे शेतकरी अगोदरच त्यांच्याकडे पूर्व नोंदणी करून घेतात. त्यामुळे यातून देखील त्यांना वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते.

हेही वाचा -हिंगोली : आशा वर्करांना मानधनासह मिळाला वाढीव मोबदला

हेही वाचा -आता तुरीचे पीकही गेले.. हिंगोलीत शेतकऱ्यांसमोर संकट

ABOUT THE AUTHOR

...view details