महाराष्ट्र

maharashtra

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू पकडला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By

Published : Dec 26, 2020, 9:17 AM IST

कोरोनामुळे अनेक घरात अन्नाचा तुडवडा निर्माण झाला आहे. मात्र, हा तुडवडा भरुन काढण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. रेशन दुकानावर पुरेशा धान्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, त्याचा रेशन दुकानदार गैरवापर करून रेशन लाभार्थ्यांना न देता, काळ्या बाजारात विक्री करीत आहे.

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू पकडला
काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू पकडला

हिंगोली- जिल्ह्यात काही केल्या रेशनचा काळा बाजार थांबायचे नावच घेत नाहीये. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात काळ्या बाजारात जाणारा तीन क्विंटल रेशनचा गहू आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, दोघांविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष रामराव राठोड (चालक), बाबाराव मांगीलाल राठोड (रेशन दुकानदार) (रा. पाटोदा ता. सेनगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

रेशन दुकानदारकांकडूनच चोरी

कोरोनामुळे अनेक घरात अन्नाचा तुडवडा निर्माण झाला आहे. मात्र, हा तुडवडा भरुन काढण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. रेशन दुकानावर पुरेशा धान्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, त्याचा रेशन दुकानदार गैरवापर करून रेशन लाभार्थ्यांना न देता, काळ्या बाजारात विक्री करीत आहे. अशाच एका रेशन दुकानाचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी निघाला असल्याची गोपनीय माहिती सेनगाव पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एम. एच. 38 ई 859 या क्रमांकाचा ऑटो ताब्यात घेतला. तपासणी केली असता ऑटोमध्ये तीन क्विंटल रेशनचा गहू आढळून आला.

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू पकडला

सेनगाव परिसरात सर्वाधिक होतो रेशनचा काळाबाजार

सेनगाव तालुका हा रेशन चा काळाबाजार करण्यामध्ये चांगलाच सक्रिय झालेला आहे. या भागात सर्वाधिक जास्त रेशन दुकानदार हे रेशनचा माल लाभार्थ्यांना न पोहोचविता काळाबाजार करतात. लाभार्थी अनेकदा तक्रारी देखील करतात. मात्र, प्रशासन स्तरावर कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे रेशन दुकान दारावर याचा काहीही परिणाम होताना दिसून येत नाही. दिवसेंदिवस रेशनचा काळाबाजार हा आजही कायम सुरूच आहे. याला कायमची आवर घालण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी लाभार्थ्यातून केली जात आहे.

एवढ्या किंमतिचा आहे मुद्देमाल

सेनगाव पोलिसांच्या छाप्यात आढळलेल्या ऑटोमध्ये तीन क्विंटल गहू अन ऑटो अशी एकूण 82 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना ताब्यात घेतले असून, यापूर्वी देखील या दुकानदाराने रेशनचा काळाबाजार केला आहे का ? याची चोकशी सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details