महाराष्ट्र

maharashtra

नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा उपचाराअभावी मृत्यू, विद्यार्थ्यांचे रुग्णालयासमोर आंदोलन

By

Published : Aug 2, 2020, 4:59 AM IST

गोंदिया जिल्ह्यातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीचा आज (शनिवार) उपचाराअभावी मृत्यू झाला. विद्यार्थीनीच्या मृत्यूनंतर महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Nursing students die due to lack of treatment in Gondia
गोंदियात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा उपचाराअभावी मृत्यू

गोंदिया - जिल्ह्यातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीचा आज (शनिवार) उपचाराअभावी मृत्यू झाला. विद्यार्थीनीच्या मृत्यूनंतर महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुभांगी गजानन बांगरे (22) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ती गोंदिया तालुक्यातील तेढवा येथील रहिवासी आहे. गोंदियातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयाची ती विद्यार्थीनी असून मागील 15 दिवसांपासून तिची प्रकृती खालावलेली होती.

गोंदियात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा उपचाराअभावी मृत्यू,...

हेही वाचा -गोंदियात वीज अंगावर कोसळून तरुणीचा मृत्यू, चार गंभीर

सुहानी बांगरे ही मागील तीन वर्षांपासून जी.एन.एम चे शिक्षण घेत होती. यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रेनी नर्स चे देखील काम करत होती. दिनांक २७ जुलैरोजी तिची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आपल्या मुलीची प्रकृती खालावत असल्याचे पाहता पालकांनी तीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची परवानगी मागितली. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी परवागी नाकारली. तसेच आज १ ऑगस्ट रोजी रुग्णालयात डॉक्टरच उपस्थित नसल्याने आणि सुहानीची प्रकृती अतिशय खालवल्याने तीचा आज उपचाराअभावी मृत्यू झाला.

यानंतर, विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आली असून दोषी डॉक्टर आणि नर्सिंग कॉलेजच्या मुख्याध्यापिका यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरवात केली. पालकांनी देखील न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. तर, यापुढे नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर असा अन्याय होऊ नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details