महाराष्ट्र

maharashtra

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटन १ नोहेंबरपासून पुन्हा सुरु

By

Published : Oct 18, 2020, 5:28 PM IST

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या स्थितीनंतर गोंदिया जिल्ह्यातील वनाने नटलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ३० ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. आता हे पर्यटन १ नोहेंबर पासून पुन्हा सुरु होणार असून केवळ ५० टक्के पर्यटकांनाच वाहनात प्रवेश दिला जाणार आहे.

Navegaon-Nagzira Tiger Project
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प

गोंदिया- कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या स्थितीनंतर गोंदिया जिल्ह्यातील वनाने नटलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ३० ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. आता हे पर्यटन १ नोहेंबर पासून पुन्हा सुरु होणार असून केवळ ५० टक्के पर्यटकांनाच वाहनात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच १० वर्षाच्या आतील मुलांना व ६५ वर्षाच्या वर असलेल्या वृद्धांना या पर्यटनासाठी बंदी असेल. त्यामुळे उशिरा का होईना, येथील पर्यटन पुन्हा सुरु होणार आहे.

लॉकडाऊन झाल्याने गोंदिया येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे १० लाखाचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे या पर्यटनावर अवलंबून असणारे येथील गाईड, जीप चालकसहीत अनेकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. गाइड व जीप चालकांचा हिरावलेला व्यवसाय आता पुन्हा एकदा त्यांना प्राप्त होणार आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प

विदर्भातील ताडोबा प्रमाणेच गोंदिया येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत राहिला आहे. दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. मात्र कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीमध्ये मार्च महिन्यापासून ते ३० ऑक्टोबरपर्यंत पर्यटनाला पूर्णतः बंद करण्यात आले होते.

अचानक उद्भवलेल्या स्थितीनंतर या ठिकाणी असलेल्या गाईड व जिप्सी चालकांचा रोजगार पूर्णपणे हिरावला गेला होता. त्यामुळे पर्यटन सुरु होणार नाही, अशी भीती त्याना वाटू लागली होती. मात्र आता १ नोव्हेंबरपासून पर्यटन पुन्हा सुरु होणार आहे. त्यामुळे कमी प्रमाणात का होईना त्यांना पुन्हा रोजगार प्राप्त होणार आहे.

नवेगाव-नागझिरा या अभयारण्यात २०० हून अधिक विविध प्रकारचे पक्षी, विविध प्रकारचे प्राणी बघायला मिळतात. शिवाय या अभयारण्यातील जैवविविधता लक्षात घेता अनेक पर्यटक अभ्यास करण्याकरिता येथे भेट देत असतात. सध्यस्थितीत ऑनलाइन बुकिंग सुरु झाली असून ऑफलाइन पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच स्वतःचे वाहनही आतमध्ये नेण्यास बंदी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details