महाराष्ट्र

maharashtra

गोंदियात पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडला जनावरांचा ट्रक

By

Published : Jan 30, 2021, 7:29 PM IST

गोंदिया जिल्ह्यात पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका लावला आहे.

गोंदियात पोलिसांनी जनावरांचा ट्रक पकडला
गोंदियात पोलिसांनी जनावरांचा ट्रक पकडला

गोंदिया- जिल्ह्यात पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांनी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान विशेष क्रॅकडाऊन मोहीम राबवली. अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे.

अजित कदम

आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे रायपूर वरून एका ट्रकमधून अवैध रित्या जनावरे डांबून नागपूरला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर देवरी पोलिसांनी देवरी - चीचगड रोड आणि देवरी - आमगाव रोड येथे नाकाबंदी केली. मात्र ट्रक चालकाला देवरीकडे येत असताना समोर पोलीस दिसताच त्याने आमगाव रोडवरून ट्रक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.

देवरी पोलिसात गुन्हा दाखल-

मात्र पोलिसांनी फिल्मी स्टाईलने त्या ट्रकचा पाठलाग करत लोहार या गावाजवळ ट्रकला पकडले. ट्रकची तपासणी घेतली असता ट्रक मध्ये जवळपास २८ जनावरे आढळून आली. या कारवाईत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र ट्रकचा क्लीनर पसार झाला आहे. ट्रक चालकाविरुध्द देवरी पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे.

हेही वाचा-नाशकात भरधाव कंटेनरच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details