महाराष्ट्र

maharashtra

Five Police Suspended Gondia : जप्तीची दारू रेकॉर्डवर कमी दाखवुन 3 युवकांना फसविले; गोंदियात 5 पोलीस निलंबित

By

Published : Jan 15, 2022, 9:46 PM IST

Updated : Jan 15, 2022, 10:33 PM IST

गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात असलेल्या पोलीस ठाणे सालेकसा ( Salekasa Police Station ) येथील ५ पोलीस शिपाई यांना निलंबित करण्यात आले आहे. ( Five Police Suspended Salekasa ) सहायक पोलीस निरीक्षक अशोक धाबळे, पोलीस नायक प्रमोद सोनवणे, पोलीस नायक अनिल चक्रे, शिपाई संतोष चुटे, शिपाई मधू सोनी अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Five Police Suspended in Gondia
गोंदियात 5 पोलीस निलंबित

गोंदिया - जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात असलेल्या पोलीस ठाणे सालेकसा ( Salekasa Police Station ) येथील ५ पोलीस शिपाई यांना निलंबित करण्यात आले आहे. ( Five Police Suspended Salekasa ) बनावट छापा टाकून तीन युवकांना या प्रकरणात गोवून आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करणे या पोलिसांना चांगलेच भोवले आहे.

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि संबंधित मुलगा याबाबत माहिती देताना

युवकांना फसवले..

सालेकसा पोलीस ठाण्यात पाच पोलिसांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला देशी दारू पकडली. त्यापैकी काही पेटी दारू ही पोलीस रेकॉर्डला दाखवली. यानंतर या पोलिसांनी विशाल दसरिया, दीपक बसोने, भूषण मोहारे यांना चारचाकी वाहनाने बोलावले. त्यांना 8 पेटी दारू ही सीलबंद करून महत्त्वाची सामुग्री आहे, असे सांगून काही दिवसांकरिता आपल्याजवळ ठेवण्यास सांगितले. या युवकांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन ही दारू विशालने आपल्या शेतात लपवून ठेवली. दोन-तीन दिवसांनी पोलिसांनी विशालला फोन करून एका अनोळखी व्यक्तीला पाठवून आठपैटी पैकी दोन पेटी दारू देण्यास सांगितले. विशालने त्या व्यक्तीला दोन पेटी दारू दिली. तो व्यक्ती जाताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि सहा पेटी दारू जप्त करून त्याला मारहाण केली. त्यांच्यावर अवैध दारू विक्रीचा आरोप लावून गुन्हा दाखल केला. ( Illegal liquor sale allegation )

हेही वाचा -Trupti Desai on Indorikar Maharaj : महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंमत असेल तर इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा - तृप्ती देसाई

युवकांनी पोलिसांना समजविण्याचा प्रयत्न केला की ही दारू आमची नाही पोलिसांची आहे. मात्र, त्यांचे कोणी ऐकले नाही त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली. याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी युवकांनी महाराष्ट्र शासनाने गृहमंत्री, मानवाधिकार आयोग आणि पोलीस अधीक्षक गोंदिया यांना पत्र लिहून या प्रकरणाची माहिती देऊन न्यायची मागणी केली. यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अहवालानुसार या प्रकरणी तपास करून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांनी सहायक पोलीस निरीक्षक अशोक धाबळे, पोलीस नायक प्रमोद सोनवणे, पोलीस नायक अनिल चक्रे, शिपाई संतोष चुटे, शिपाई मधू सोनी यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्ह्यात या घटनेने रक्षकच बनले भकक्षक झाल्याची चर्चा सुरू आहे.

Last Updated : Jan 15, 2022, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details