महाराष्ट्र

maharashtra

अवघ्या तीन तासात पोलिसांनी रुग्णालयाची रोकड लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

By

Published : May 29, 2021, 7:13 PM IST

धुळे शहरातील एका रुग्णालयाची सह लाखांची रोकड लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी अवघ्या तीन तासांत अटक केली आहे. या टोळीतील इतर आरोपींचा शोध पोलीस करत आहेत.

आरोपीसह पोलीस पथक
आरोपीसह पोलीस पथक

धुळे -शहरातील विघ्नहर्ता रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याकडून रुग्णालयाची 6 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे. या टोळीतील चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत व इतर आरोपींचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानीक गुन्हे शाखेने आणि पश्चिम देवपूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत या टोळीतील चौघांना अवघ्या तीन तासांत अटक केली असून त्यांच्याकडून दीड लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

अवघ्या तीन तासात चोरट्यांना अटक

घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या तीन तासांत चोरट्यांच्या टोळीतील चौघांना ताब्यात घेतले आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेच रचला होता कट

पोलिसांच्या तपासात रुग्णालयात वार्डबॉय म्हणून कामाला असलेल्या सनी मोहिते यानेच रुग्णालयातील रक्कम लुटीचा कट रचल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -धक्कादायक.. जमिनीच्या वादातून आईनेच मुलींच्या मदतीने मुलाची केली हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details