महाराष्ट्र

maharashtra

Six Inch Knife in Eyes : काय सांगताय काय ? रुग्णाच्या डोळ्यातून डॉक्टरांनी चक्क चाकू काढला!

By

Published : Aug 10, 2022, 7:44 AM IST

Updated : Aug 10, 2022, 10:03 AM IST

Dhule Doctor

धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयात ( Bhausaheb Hire gov hospital Dhule ) एका चाळीस वर्षीय रुग्णाच्या डोळ्यातून चक्क सहा इंची चाकू काढून त्या रुग्णाला डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे ( Dr Arun More Dhule ) यांनी नेत्र रोगतज्ञ डॉ. मुकर्रम खान ( Dr Mukarm Khan ) यांनी ही शस्त्रक्रिया केली.

धुळे- डोळ्याच्या आपण विविध शस्त्रक्रिया ऐकल्या असतील, वाचल्या असतील. मात्र, डोळ्यात गेलेला चाकू काढण्याची शस्त्रक्रिया ( Six inch knife through patients eyes ) आपण ऐकली, वाचली का? वाचून, ऐकून धक्का बसला ना मंडळी. मात्र हे खरे आहे.

धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयात ( Bhausaheb Hire gov hospital Dhule ) एका चाळीस वर्षीय रुग्णाच्या डोळ्यातून चक्क सहा इंची चाकू काढून त्या रुग्णाला डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. संबंधित डॉक्टर आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमवर अभिनंदनाच व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रुग्णाच्या डोळ्यातून डॉक्टरांनी चक्क चाकू काढला


असे झाले शस्त्रक्रियेचे नियोजन :नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील ४० वर्षीय विलन सोमा भिलावे यांच्या डोळ्यात धातूची पट्टी गेल्याने त्याला तातडीने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी असल्येला डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांना धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार मध्यरात्री साधारण अडीच वाजेच्या सुमारास विलन सोमा भिलावेयाला त्याच्या नातेवाईकांनी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. रात्रीच रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील सर्व डॉक्टरांची मिटिंग झाली. त्यात त्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याविषयीचे नियोजन करण्यात आले. पहाटेच्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली. तत्पूर्वी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे ( Dr Arun More Dhule ) यांनी नेत्र रोगतज्ञ डॉ. मुकर्रम खान ( Dr Mukarm Khan ) यांच्यावर उपचाराची जबाबदारी सोपवली. संबंधित रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्याच्यावर योग्य ते उपचार करण्याचे निर्देश संबंधितांनी दिलेत.



अशी झाली शस्त्रक्रिया - डॉ. मुकर्रम खान यांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी केली असता त्या रुग्णाच्या डोळ्यात खोलवर धातूची पट्टी गेल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास आले. डोळ्यात धातूची पट्टी गेलेली असल्याने रुग्णाला असहाय्य त्रास सुरू होता. त्याला कमी दिसत होते. या धातूच्या पट्टीने रुग्णाच्या कान, नाक , घशालाही इजा झालेली असण्याची भीती डॉक्टरांना होती. अशी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते. मात्र सर्व परिस्थितीचा विचार करून डॉ. मुकर्रम खान यांनी कान, नाक , घसा याच्याशी संबंधित डॉक्टरांना देखील बोलावले . मध्यरात्री साधारण अडीचच्या सुमारास रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णावर रात्रीच सर्व नियोजन करून पहाटेच्या वेळी ही गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया सुरू झाली.



डॉक्टर आणि टीमवर अभिनंदन, कौतुकाचा वर्षाव - संबंधित रुग्णाच्या डोळ्यातून धातूची पट्टी काढत असतांना शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांसह त्यांच्या टीमला समोरचे दृश्य पाहून धक्काच बसला. ती धातूची पट्टी नाही तर चक्क ६ इंचाचा चाकू असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आले. गुंतागुंतीची ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया डॉ. मुकर्रम खान आणि त्यांच्या टीमने मोठ्या धैर्यानं, आत्मविश्वासानं यशस्वी केली अन संबंधित रुग्णाला जीवदान दिलं . रुग्णाला जीवदान देण्याऱ्या डॉक्टरांचे, शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमवर केवळ रुग्णाच्या नातेवाईकांनीच नव्हे तर रुग्णालयातील उपस्थितांनी देखील अभिनंदन, कौतुकाचा वर्षाव केला.



डॉक्टर्स, स्टाफची माफक अपेक्षा - सरकारी रुग्णालयातदेखील चांगली तत्पर सेवा मिळते. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर देखील रुग्णसेवेसाठी तत्पर असतात. सरकारी रुग्णालयाबाबत आजही विश्वास आजही टिकून आहे. हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले. मात्र सरकारी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्ण त्याच्या नातेवाईकांनीदेखील सरकारी रुग्णालयातील नियमांचे पालन करून डॉक्टरांना व स्टाफला सहकार्य करायला हवे. सरकारी रुग्णालयात स्वच्छता पाळायला हवी, एवढीच माफक अपेक्षा डॉक्टर्स आणि स्टाफने व्यक्त केली आहे.

हेही वाचा-Dental Hospital Nagpur : नागपूरचे शासकीय दंत रुग्णालय देशात 9 व्या क्रमांकावर

Last Updated :Aug 10, 2022, 10:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details