Dental Hospital Nagpur : नागपूरचे शासकीय दंत रुग्णालय देशात 9 व्या क्रमांकावर

author img

By

Published : Aug 7, 2022, 7:09 PM IST

Government Dental Hospital of Nagpur

नागपुरातील शासकीय दंत रुग्णालयाने ( Government Dental Hospital Nagpur) आपली वेगळी ओळख मिळवली आहे. देश पातळीवर नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंगमध्ये ( NIRF ) दंतमहाविद्यालय 9 व्या क्रमांकावर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे ( Union Ministry of Education ) देशात भरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता यादी दरवर्षी जाहीर करण्यात येते. यातच यंदा नागपूरच्या दंत महाविद्यालयाने सुद्धा देशभरातील 171 डेंटल कॉलेजमधून 141 कॉलेज महाविद्यालयाने अर्ज दाखल केले होते.

नागपूर - शासकीय रुग्णालय म्हटलं की नाक मुरडण्याची सवय आपसूकच आपल्याला पडलेली आहे. पण, नागपुरातील शासकीय दंत रुग्णालयाने ( Government Dental Hospital Nagpur) आपली वेगळी ओळख मिळवली आहे. ही ओळख केवळ नागपूर पुरतीच नाही तर देश पातळीवर दंतमहाविद्यालयात 9 व्या क्रमांकावर आहे. पण, ही ओळख मिळवताना रुग्णालयात 54 वर्षाचा इतिहासात जनमानसाला उपयोगी पडेल असे संशोधन ( Research ) करण्याचे काम करताना जवळ जवळ 525 रिसर्च पेपर सादर झाले आहे.

दंत रुग्णालय नागपूर

हेही वाचा - MNS Vs Governor Koshyari : 'कोश्यारींनी पुन्हा आपल्या बुद्धिमत्तेची कुवत...'; राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यावरुन मनसेचा हल्लाबोल


पाच दशकातील कामगिरी.. एरवी शासकीय दंत रुग्णालय म्हंटल तर केवळ दातांवर होणाऱ्या सौम्य उपचार प्रत्येकालाच माहीत असते. पण यापुढे जाऊन रुग्णलयातील जवळपास सर्वच विभागाच्या वतीने आपल्या पातळीवर काही तरी वेगळं करण्याचा मानस ठेवून काम केले जात आहे. याचीच फलश्रुती म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांनी जाहीर केलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क अर्थात एनआयआरएफ (NIRF) रँकिंगमध्ये टॉप नाईन मध्ये स्थान मिळवलेले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे ( Union Ministry of Education ) देशात भरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता यादी दरवर्षी जाहीर करण्यात येते. यातच यंदा नागपूरच्या दंत महाविद्यालयाने सुद्धा देशभरातील 171 डेंटल कॉलेजमधून 141 कॉलेज महाविद्यालयाने अर्ज दाखल केले होते.

पाच विद्यार्थी परदेशातले - ही रँकिंग मिळत असताना दंत महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचा शिक्षण कुठल्या महाविद्यालयात दिले जाते हे समजण्यास सोपी ठरते. यातच ही नववी रँकिंग देशभराच्या पातळीवर मिळाल्याने बाहेरून विद्यार्थी शिकायला येत होतेच रँकिंगमुळे विश्वास आणखी दृढ होणार आहे. दंत महाविद्यालयात सार्क देशातून एक विद्यार्थी दाखल होत असतो. सध्याच्या घडीला पाच विदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घेतली असल्याची माहिती दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातरकर ( Dr. Abhay Datarkar ) यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितली आहे.

बदलत्या काळासोबत संशोधन.. यात विद्यालयात काम करतांना बदलत्या कालानुरूप उपचार पद्धतीत सुद्धा नवं नवीन संशोधन केले जात आहे. यात उपचार करताना नव नवीन तंत्रज्ञान रुग्णांना अधिकार अधिक कसा फायदा होऊ शकतो. याचा विचार करून त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही दिली जात आहे. दातांचा आकार सरळ करण्यासाठी क्लिप लावली जाते. मात्र, ही क्लिप लावत असताना बरेचदा रुग्णांमधून रिजल्ट मिळत नाही. त्यामुळे कॉलेजच्या मदतीने एक सेंसर तयार करून ते या दाताच्या क्लिप मध्ये बसवण्यात आले आहे. त्यामुळे तो रुग्ण खरंच त्या क्लिपचा 24 तासात किती वापर करतो. का अचुक डेटा मिळून त्या रुग्णाचा लागणारा उपचार कालावधी कमी केला जात आहे. तसेच घोरणार व्यक्ती अनेक घरात असतो. त्याचे अनेक कारणं आहे. पण यातील एक अनेक जबड्याच्या आणि जिभीशी जुडलेलं आहे.

महाविद्यालयाकडे 10 पेटंट - मेडिकलच्या स्लिप स्पेशलिस्ट सोबत मिळून खास पध्दतीची क्लिप बनवत घोरण्याचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. महाविद्यालयाने 26 कॉपीराईट सुद्धा मिळवलेले आहे. येत्या काळात आणखी सहा ते सात कॉपीराइट्स मिळणार आहे. याच बरोबर हे यापध्दतीचे डिव्हाईस बनवत जवळपास 10 पेटंट मिळाले असून आणखी चार पेटंट मिळण्याच्या शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती दंतव्यंगोपचार विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. वसुंधरा भड ( Dr Vasundhara Bhad ) यांनी ईटीव्हीशी बोलतांना दिली आहे. या कामगिरीमुळे विद्यालयाच्या शिक्षणाचा दर्जा आणखी वाढण्यास आणि नव नवीन सांशोधनात फायद्याचा ठरेल असेही त्यांनी सांगितले.

भविष्यात आणखी रँकिंग वाढवण्यास प्रयत्न केले जाईल.. रुग्णालयाकडून इतक्या वर्षात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल सह बाह्य उपक्रम राबवत काम करण्यात आले आहे. खास करून रिसर्चमध्ये काम करण्यात आले. ग्रॅज्युएट आउटकममध्ये 83% टक्के स्कोरिंग मिळाले आहे. तसेच विद्यालयातून बाहेर पडलेले विद्यार्थी अनेक ठिकाणी जाऊन मोठ्या हुद्यावर जाऊन आपले कार्य केलें आहे. विविध संस्थामध्ये जाऊन सामाजिक बांधिलकी ही जपत आहे. एनआयआरएफमध्ये सुद्धा ही कामगिरी महत्वाची ठरली आहे. मेडिकल कॉलेजच्या 18 पीजीच्या विद्यार्थ्यांना आयसीएमआर संशोधनासाठी स्कॉलरशिप मिळाली आहे. त्यामुळे रिसर्च करण्यास अधिक फायद्याचे ठरणार आहे. यापूर्वी आऊट लुकमध्ये मागील वेळेस बारावा रँक होता यंदा तो सुधारून चौथा रँक मिळालेला आहे. इंडिया टुडेच्या रँकिंगमध्ये ( India Today's Rankings ) 12 व्या नंबर वर असून ते मागील वर्षीही परिस्थिती कायम असल्याचे मुखरोग शल्यचिकित्सक वर्षा माणेकर यांनी बोलतांना ईटीव्ही भरातशी बोंलताना सांगितले.

हेही वाचा - JEE Result: जेईईचा आज निकाल लागणार; 'या' साईटवर पाहता येणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.