महाराष्ट्र

maharashtra

क्रिकेटच्या वाघाचा ताडोबाला निरोप

By

Published : Jan 26, 2020, 5:54 PM IST

ताडोबा हे जगप्रसिद्ध अभयारण्य आहे. येथील वाघांना पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात. सचिनला या व्याघ्र प्रकल्पाची भूरळ आहे. तो अनेकदा कुटुंबासह येथे येत असतो. नागपूर येथील खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त सचिन विदर्भात आला होता. त्यामुळे या व्याघ्रप्रकल्पामध्ये परिवारासह त्याने दोन दिवसीय जंगल सफारीचा बेत आखला.

sachin tendulkar leaves tadoba happily as he was able to see tiger
क्रिकेटच्या वाघाचा ताडोबाला निरोप

चंद्रपूर -भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरने दोन दिवस जंगल सफारीचा आंनद घेऊन ताडोबाचा निरोप घेतला आहे. सचिन आपल्या कुटुंबासह ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात दाखल झाला होता. 'बांबू हट' नावाच्या रिसॉर्टमध्ये सचिन परिवारासह मुक्कामाला होता.

हेही वाचा -..प्रश्न सुटला का?

ताडोबा हे जगप्रसिद्ध अभयारण्य आहे. येथील वाघांना पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात. सचिनला या व्याघ्र प्रकल्पाची भूरळ आहे. तो अनेकदा कुटुंबासह येथे येत असतो. नागपूर येथील खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त सचिन विदर्भात आला होता. त्यामुळे या व्याघ्रप्रकल्पामध्ये परिवारासह त्याने दोन दिवसीय जंगल सफारीचा बेत आखला.

व्याघ्रप्रकल्पामध्ये दाखल झाल्यानंतर, कोलारा गेटमधून सचिनने जंगल सफारीला जाण्याचे निश्चित केले. या सफारीत त्याला वाघाने हुलकावणी दिली. दुसऱ्या दिवशी सचिनने मदनापूर गेटमधून प्रवेश केला. या परिसरात असणाऱ्या अनेक नयनरम्य ठिकाणी जाऊन त्याने आनंद लूटला. या सफारीत त्याला वाघाचे दर्शन झाले.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीसुद्धा सचिनने सकाळी जंगल सफारी केली. त्यावेळी त्याच्यासोबत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते. या सफारीनंतर, त्याने थोडी विश्रांती घेतली. निरोप घेण्यापूर्वी, त्याने चिमूर विधान सभेचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांची भेट घेतली. रिसॉर्ट सोडताना त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप गर्दी केली होती.

Intro:क्रिकेटच्या वाघाचा ताडोबाला निरोप
दोन तासापुर्वीच सोडले बॉम्बु रिसोर्ट
चिमूर(जितेंद्र सहारे)
क्रिकेट विश्वामध्ये आपल्या वैविध्यपुर्ण फटके बाजी करून अनेक गोलदांजाला घाबरवुन सोडणाऱ्या सचिन तेंदुलकर या क्रिकेटच्या वाघाला जंगलातल्या वाघाची भूरड पडली आहे . हमखास वाघाचे दर्शनाकरीता प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा मध्ये दोन दिवसाच्या जंगल सफारी करीता परीवारासह शुक्रवार पासुन तालुक्यातील बांम्बु रिसोर्ट मध्ये मुक्कामाला होते .दोन दिवस जंगल सफारीचा आंनद घेऊन क्रिकेटच्या वाघाने ताडोबाचा निरोप घेतला .
वाघाचे दिमाखदार जंगलातील संचार पाहणे प्रत्येकाला आवडते .त्यात क्रिकेट मैदानात दिमाखाने संचार करणाऱ्या क्रिकेटच्या वाघाला जंगलातील वाघाची भुरळ पडली आहे . त्यामूळे विदर्भात आल्या नंतर जंगल सफारीचा आनंद सचिन तेंडुलकर घेत असतो .नागपूर जवडील करांडला अभयारण्यातील जंगल सफारी मध्ये वाघाच्या दर्शनाचा आंनद घेतला होता . नागपूर येथील खासदार क्रिडा महोत्सवा निमीत्त विदर्भात येण झाल्याने हमखास वाघ्र दर्शन होणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा मध्ये परीवारासह दोन दिवसीय जंगल सफारीचा बेत आखण्यात आला .
शासण प्रशासण स्तरावर कमालीची गुप्तता ठेऊन चिमूर - ताडोबा रोड वरील बाँम्बु रिसोर्ट येथे शुक्रवाला सचिन परिवारासह दाखल झाला व लगेच कोलारा गेट मधुन जंगल सफारीला गेला . .या सफारीत वाघाने हुलकावणी दिली. दुसऱ्या दिवशी सचिन तेंडुलकर यांनी मदनापूर गेट मधून प्रवेश केला या परिसरातील अनेक पॉईंट वर जाऊन आनंद घेतला याच दरम्यान सचिन व अंजली यांना जंगलातील वाघाने ऐटीत दर्शन दिले तर सकाळच्या सफारीत सचिन कोलारा गेट मधून बाहेर आलेत. दुपारच्या जेवणानंतर विश्रांती घेतल्यावर दुपारच्या सफरीतसाठी सचिन मदनापूर गेट मधूनच ताडोबात गेलेत याही वेळी ताडोबातील वाघाने क्रिकेटच्या वाघाला दर्शन दिले.
सचिनने प्रजासत्ता दिनाच्या दिवशी सुद्धा सकाळच्या जंगल सफारीचा आंनद लुटला .या सर्व जंगल सफारी मध्ये त्यांच्या सोबत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते .सकाळच्या सफारी नंतर थोडी विश्रांती घेतली.त्याच्या नियोजीत कार्यक्रमानुसार ४.०० वाजता रिसोर्ट सोडणार होते .मात्र अचानक दोन तासा अगोदर त्यांनी ताडोबाचा निरोप घेतला . त्यापुर्वी चिमूर विधान सभेचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचेशी भेट घेऊन सत्कार स्विकारला. रिसोर्ट सोडताना बाहेर जमलेल्या चाहत्यांना सचिनचे दर्शन झाल्याने चाहते आंनदले मात्र त्यांचेशी हितगुज न केल्याने चाहते हिरमुसले .


Body:बॉम्बु रिसोर्ट मधुन ताडोबास निरोप देताना सचिनConclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details