ETV Bharat / sports

..प्रश्न सुटला का?

author img

By

Published : Jan 26, 2020, 4:54 PM IST

Updated : Jan 26, 2020, 5:18 PM IST

हे नाव धोनीचा बदली खेळाडू म्हणून कधीच समोर आलेलं नव्हतं. पण, नशीबाचं चक्र कसं फिरतं याची प्रचीती २०२० च्या सुरुवातीला आली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मुंबईत वानखेडेवर रंगलेल्या पहिल्या सामन्यात पंत जखमी झाला आणि यष्टिरक्षणाची जबाबदारी राहुलकडे चालून आली.

..प्रश्न सुटला का?
Does Lokesh Rahul helping team India to solve question of wicketkeeper batsman?

हैदराबाद - 'फलंदाजीसोबत विकेटकिपींगची अतिरिक्त जबाबदारी आवडतेय', हे वाक्य आहे भारतीय क्रिकेट संघाचा आणि फॉर्मात असलेला फलंदाज लोकेश राहुलचं. २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर, धोनीला भारतीय संघात कोण 'रिप्लेस' करणार याची चर्चा चहुबाजूंनी रंगली होती. त्यात रिषभ पंत, ईशान किशन, संजू सॅमसन, वृद्धिमान साहा या शिलेदारांची नाव आघाडीवर होती आणि या नावांमध्ये सर्वात आघाडीचं नाव होतं रिषभ पंतचं. धोनीनं क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी 'विश्रांती' घेतल्यानंतर, पंतची सर्वांगांनी कसोटी घेण्यात आली.

Does Lokesh Rahul helping team India to solve question of wicketkeeper batsman?
धोनीला पर्याय म्हणून या खेळाडूंची चर्चा

एक आक्रमक फलंदाज आणि सर्वात म्हणजे डावखुरा युवा फलंदाज अशी ओळख असणाऱ्या पंतला 'धोनीचा शिष्य' अशी एक अतिरिक्त ओळखही देण्यात आली. भारतीय संघाला धोनीची रिप्लेसमेट मिळणं किवा शोधणं याचा अर्थ संघात फक्त एक यष्टिरक्षक उपलब्ध करून देणं असा नव्हता. खेळाचं भान असलेला, विकेटमागे नेमकं काय करायचं हे ठाऊक असलेला, गरज पडेल तेव्हा फलंदाजी करून धावसंख्येला आकार देणारा, शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या मनात धडकी भरवणारा खेळाडू ही धोनीची ओळख होती. ती ओळख २०१९ च्या अखेरपर्यंत टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना सापडली नाही. पंतही अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे धोनीच्या पर्यायाचा शोध नव्यानं सुरू झाला. अशातच एक नाव समोर आलं. ते नाव म्हणजे, लोकेश राहुल.

'लोकेश राहुल' हे नाव धोनीचा बदली खेळाडू म्हणून कधीच समोर आलेलं नव्हतं. पण, नशीबाचं चक्र कसं फिरतं याची प्रचीती २०२० च्या सुरुवातीला आली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मुंबईत वानखेडेवर रंगलेल्या पहिल्या सामन्यात पंत जखमी झाला आणि यष्टिरक्षणाची जबाबदारी राहुलकडे चालून आली.

राहुल स्थानिक क्रिकेटमध्ये, वेळ पडल्यास आणि आयपीएलमध्ये यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळत होता. आधीच फॉर्मात असलेल्या आणि वरच्या फळीतील भक्कम फलंदाज म्हणून राहुलने न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात दमदार फलंदाजीसोबत दमदार यष्टिरक्षणही केले. आता विराटही त्याच्याकडे पूर्णवेळ यष्टिरक्षक आणि भक्कम फलंदाज म्हणून पाहत आहे. राहुलच्या बाबतीत केलेला हा प्रयोग टीम इंडियाला कितपत फायदेशीर ठरू शकतो? हा मोठा प्रश्न आहे.

या प्रश्नाचं उत्तर क्रिकेटच्या इतिहासातच दडलेलं आहे. २००० च्या दशकात भारतीय संघाला अडचणीच्या वेळी एका राहुलनेच तारलं होते. यंदाही एक राहुलचं तारणहार म्हणून समोर आला आहे. योगायोगाने दोन्हीही राहुल कर्नाटकचेच आहेत. पहिला तारणहार म्हणजे “द वॉल” राहुल द्रविड. भारतीय फलंदाजीची अभेद्य भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविडकडे अशाच स्वरूपात यष्टिरक्षकाची भूमिका चालून आली. स्लिपमधील क्षेत्ररक्षणाचा 'बादशहा' असलेल्या द्रविडला ही भूमिका निभावणं जास्त अवघड गेली नाही. पण , या प्रयोगाचा फायदा संघाला झाला. यष्टिरक्षणाची चिंता मिटल्यानंतर संघाला एक अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळवता येऊ शकतो, हे द्रविडच्या उदाहरणानं स्पष्ट झालं. 2002 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या नेटवेस्ट ट्रॉफीतही द्रविडने यष्टीरक्षण केलं होतं. लॉर्ड्सवर झालेल्या फायनलमध्ये द्रविडमुळेच भारताला अतिरिक्त फलंदाज खेळवता आला. १४६ धावांवर 5 गडी बाद झाल्यानंतरही कैफ आणि युवराज मैदानावर होते. दोघांनीही अभुतपूर्व कामगिरी करुन इतिहास घडवला आणि भारताने ती स्पर्धा खिशात टाकली हे काही वेगळं सांगायला नको.

भारताबाहेर सांगायचं झालं तर, दिग्गज संघांनीही हा प्रयोग करून पाहिला आहे. मातब्बर असलेल्या ऑस्ट्रेलियानं गिलख्रिस्ट, श्रीलंकेने कुमार संगकारा, आफ्रिकेने क्विंटन डीकॉक, इंग्ंलडने जॉस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यां खेळाडूंना संघात पूर्णवेळ यष्टिरक्षक आणि वरच्या फळीतील भक्कम फलंदाज म्हणून मोठं केलं. पॉंटिंगच्या नेतृत्वात खेळलेल्या ऑस्ट्रेलिया संघात डावखुरा गिलख्रिस्ट गरज पडेल त्या ठिकाणी हमखास फलंदाजी करायचा. शिवाय तो यष्टिरक्षणातही तरबेज होता. फलंदाजी बळकट असल्यामुळे गोलंदाजांवर ताण येण्याचा विषयच नव्हता. या कारणामुळं ऑस्ट्रेलियाला 'अभेद्य' असा दर्जा देण्यात आला. २०१९ च्या विश्वविजेत्या इंग्लंडने विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान संघात जॉस बटलर आणि जॉनी बेअरस्टो अशा आक्रमक खेळाडूंना संघात स्थान दिलं होतं आणि त्याचा फायदा त्यांना योग्य वेळी झाला.

Does Lokesh Rahul helping team India to solve question of wicketkeeper batsman?
भरवशाचा फलंदाज आणि पूर्णवेळ यष्टिरक्षक असलेले इतर देशातील आजी-माजी खेळाडू

अनेक संधी मिळालेल्या पंतला आता खरचं 'कमबॅक' करायचं असेल तर, त्याच्यापुढचा यष्टिरक्षकाचा निकष पुसला गेला आहे. आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा समोर ठेऊन राहुलच्या रूपात टीम इंडियाला नवा 'तारणहार' मिळाला आहे. त्यामुळे संघाला अतिरिक्त फलंदाज अथवा अष्टपैलू खेळवता येऊ शकतो. फलंदाजी शेवटपर्यंत असली तर, गोलंदाजही आपली जबाबदारी चोख पार पाडू शकतात. भरवशाचा फलंदाज आणि पूर्णवेळ यष्टिरक्षक अशा गुणांनी भरलेला एकच खेळाडू संघात लवचिकता निर्माण करतो. हीच लवचिकता पॉंटिगच्या ऑस्ट्रेलिया आणि पूर्वीच्या विंडीजकडे होती. लोकेश राहुलमुळे ही लवचिकता टीम इंडियाला लाभली आहे का? आणि आगामी काळात अभेद्य नावाचा 'टॅग' आपल्याला लागले का? हे काळचं ठरवेल.

Intro:Body:

प्रश्न सुटला का?

हैदराबाद - 'फलंदाजीसोबत विकेटकिपींगची अतिरिक्त जबाबदारी आवडतेय', हे वाक्य आहे भारतीय क्रिकेट संघाचा आणि फॉर्मात असलेला फलंदाज लोकेश राहुलचं. २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर, धोनीला भारतीय संघात कोण 'रिप्लेस' करणार याची चर्चा चहुबाजूंनी रंगली होती. त्यात रिषभ पंत, ईशान किशन, संजू सॅमसन, वृद्धिमान साहा या शिलेदारांची नाव आघाडीवर होती. आणि या नावांमध्ये सर्वात आघाडीचं नाव होतं रिषभ पंतचं. धोनीनं क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी 'विश्रांती' घेतल्यानंतर, पंतची सर्वांगांनी कसोटी घेण्यात आली. एक आक्रमक फलंदाज आणि सर्वात म्हणजे डावखुरा युवा फलंदाज अशी ओळख असणाऱ्या पंतला 'धोनीचा शिष्य' अशी एक अतिरिक्त ओळखही देण्यात आली. भारतीय संघाला धोनीची रिप्लेसमेट मिळणं किवा शोधणं याचा अर्थ संघात फक्त एक यष्टिरक्षक उपलब्ध करून देणं असा नव्हता. खेळाचं भान असलेला, विकेटमागे नेमकं काय करायचं हे ठाऊक असलेला, गरज पडेल तेव्हा फलंदाजी करून धावसंख्येला आकार देणारा, शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या मनात धडकी भरवणारा खेळाडू ही धोनीची ओळख होती. ती ओळख २०१९ च्या अखेरपर्यंत टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना सापडली नाही. पंतही अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे धोनीच्या पर्यायाचा शोध नव्यानं सुरु झाला. अशातच एक नाव समोर आलं. ते नाव म्हणजे, लोकेश राहुल.

हे नाव धोनीचा बदली खेळाडू म्हणून कधीच समोर आलेलं नव्हतं. पण, नशीबाचं चक्र कसं फिरतं याची प्रचीती २०२० च्या सुरुवातीला आली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मुंबईत वानखेडेवर रंगलेल्या पहिल्या सामन्यात पंत जखमी झाला आणि यष्टिरक्षणाची जबाबदारी राहुलकडे चालून आली.

राहुल स्थानिक क्रिकेटमध्ये, वेळ पडल्यास आणि आयपीएलमध्ये यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळत होता. आधीच फॉर्मात असलेल्या आणि वरच्या फळीतील भक्कम फलंदाज म्हणून राहुलने न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात दमदार फलंदाजीसोबत दमदार यष्टिरक्षणही केले. आता विराटही त्याच्याकडे पूर्णवेळ यष्टिरक्षक आणि भक्कम फलंदाज म्हणून पाहत आहे. राहुलच्या बाबतीत केलेला हा प्रयोग टीम इंडियाला कितपत फायदेशीर ठरू शकतो? हा मोठा प्रश्न आहे.

या प्रश्नाचं उत्तर क्रिकेटच्या इतिहासातच दडलेलं आहे. २००० च्या दशकात भारतीय संघाला अडचणीच्या वेळी एका राहुलनेच तारलं होते. यंदाही एक राहुलचं तारणहार म्हणून समोर आला आहे. योगायोगाने दोन्हीही राहुल कर्नाटकचेच आहेत. पहिला तारणहार म्हणजे “द वॉल” राहुल द्रविड. भारतीय फलंदाजीची अभेद्य भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविडकडे अशाच स्वरूपात यष्टिरक्षकाची भूमिका चालून आली. स्लिपमधील क्षेत्ररक्षणाचा 'बादशहा' असलेल्या द्रविडला ही भूमिका निभावणं जास्त अवघड गेली नाही. पण , या प्रयोगाचा फायदा संघाला झाला. यष्टिरक्षणाची चिंता मिटल्यानंतर संघाला एक अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळवता येऊ शकतो, हे द्रविडच्या उदाहरणानं स्पष्ट झालं. 2002 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या नेटवेस्ट ट्रॉफीतही द्रविडने यष्टीरक्षण केलं होतं. लॉर्ड्सवर झालेल्या फायनलमध्ये द्रविडमुळेच भारताला अतिरिक्त फलंदाज खेळवता आला. १४६ धावांवर 5 गडी बाद झाल्यानंतरही कैफ आणि युवराज मैदानावर होते. दोघांनीही अभुतपूर्व कामगिरी करुन इतिहास घडवला आणि भारताने ती स्पर्धा खिशात टाकली हे काही वेगळं सांगायला नको.

भारताबाहेर सांगायचं झालं तर, दिग्गज संघांनीही हा प्रयोग करून पाहिला आहे. मातब्बर असलेल्या ऑस्ट्रेलियानं गिलख्रिस्ट, श्रीलंकेने कुमार संगकारा, आफ्रिकेने क्विंटन डीकॉक, इंग्ंलडने जॉस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यां खेळाडूंना संघात पूर्णवेळ यष्टिरक्षक आणि वरच्या फळीतील भक्कम फलंदाज म्हणून मोठं केलं. पॉंटिंगच्या नेतृत्वात खेळलेऱ्या ऑस्ट्रेलिया संघात डावखुरा गिलख्रिस्ट गरज पडेल त्या ठिकाणी हमखास फलंदाजी करायचा. शिवाय तो यष्टिरक्षणातही तरबेज होता. फलंदाजी बळकट असल्यामुळे गोलंदाजांवर ताण येण्याचा विषयच नव्हता. या कारणामुळं ऑस्ट्रेलियाला 'अभेद्य' असा दर्जा देण्यात आला. २०१९ च्या विश्वविजेत्या इंग्लंडने विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान संघात जॉस बटलर आणि जॉनी बेअरस्टो अशा आक्रमक खेळाडूंना संघात स्थान दिलं होतं आणि त्याचा फायदा त्यांना योग्य वेळी झाला.

अनेक संधी मिळालेल्या  पंतला आता खरचं 'कमबॅक' करायचं असेल तर, त्याच्यापुढचा यष्टिरक्षकाचा निकष पुसला गेला आहे. आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा समोर ठेऊन राहुलच्या रूपात टीम इंडियाला नवा 'तारणहार' मिळाला आहे. त्यामुळे संघाला अतिरिक्त फलंदाज अथवा अष्टपैलू खेळवता येऊ शकतो. फलंदाजी शेवटपर्यंत असली तर, गोलंदाजही आपली जबाबदारी चोख पार पाडू शकतात. भरवशाचा फलंदाज आणि पूर्णवेळ यष्टिरक्षक अशा गुणांनी भरलेला एकच खेळाडू संघात लवचिकता निर्माण करतो. हीच लवचिकता पॉंटिगच्या ऑस्ट्रेलिया आणि पूर्वीच्या विंडीजकडे होती. लोकेश राहुलमुळे ही लवचिकता टीम इंडियाला लाभली आहे का? आणि आगामी काळात अभेद्य नावाचा 'टॅग' आपल्याला लागले  का हे काळचं ठरवेल.

Conclusion:
Last Updated :Jan 26, 2020, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.