महाराष्ट्र

maharashtra

चंद्रपूर जिल्ह्यात 39 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, एकाचा मृत्यू

By

Published : Mar 30, 2021, 10:02 PM IST

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासांत 39 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 27 हजार 477 वर पोहोचली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासांत 39 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 477 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात 125 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे.

2 लाख 71 हजार 655 नमुन्यांची तपासणी

जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 71 हजार 655 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 40 हजार 731 नमुने निगेटिव्ह आले आहे.

25 हजार 62 कोरोनामुक्त तर 1 हजार 990 सक्रिय रुग्ण

आतापर्यंत 25 हजार 62 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1 हजार 990 सक्रिय रुग्ण जिल्ह्यात असून बाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 425 बाधितांचे मृत्यू

आज मृत झालेल्यामध्ये गाडीसुरला (ता. मुल) येथील 52 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. आतापर्यंत 425 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोना गेला आहे, या मानसिकेतून नागरिकांनी बाहेर पडाेव. त्याचबरोबर गर्दी करणे टाळावे व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा -चंद्रपूरमध्ये पोलिसांसाठी खुली व्यायामशाळा

ABOUT THE AUTHOR

...view details