महाराष्ट्र

maharashtra

24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, आतापर्यंत दहा हजार बाधित कोरोनामुक्त

By

Published : Oct 17, 2020, 8:48 PM IST

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासांत 145 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. सध्या 2 हजार 994 बाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

file photo
संग्रहित छायाचित्र

चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्या बाधितांची संख्या उपचार घेणाऱ्या सक्रिय बाधितांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 10 हजार 36 बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचार घेत असलेले बाधित 2 हजार 994 आहे. गेल्या 24 तासात नव्याने 145 बाधितांची नोंद झाली असून एकही बाधितांचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत 197 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 187, बुलडाणा, भंडारा, व तेलंगाणा येथील प्रत्येकी एक, गडचिरोलीतील तीन आणि यवतमाळ येथील चौघांचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या

जिल्ह्यात 24 तासांत पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 78, बल्लारपूर तालुक्यातील 3, पोंभूर्णा, चिमूर व भद्रावती तालुक्यातील प्रत्येकी एक, मुल तालुक्यातील आठ, जिवती, सावली तालुक्यातील प्रत्येकी तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील 17, नागभीड, सिंदेवाही तालुक्‍यातील प्रत्येकी 12, वरोरा तालुक्यातील 2, गडचिरोली येथील चार असे एकूण 145 नवे बाधित समोर आले आहेत.

हेही वाचा -अखेर 'तो' बिबट्या जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

ABOUT THE AUTHOR

...view details