महाराष्ट्र

maharashtra

बुलडाण्यात गुटख्याच्या गोडाऊनवर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

By

Published : May 23, 2021, 1:43 AM IST

संग्रामपूर तालुक्यातील लाडणापुर येथे गुटखा गोडाऊनवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने छापा टाकून १० लाख ३२ हजार ५७० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणात आरोपी देवीलाल जयस्वाल, नितीन जयस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी धीरज जयस्वाल हा फरार झाला असून सोनाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर खामगांव येथील तलाव रोडवरील सिंधी कॉलोनी भागातील शंकर वाधवानी यांच्या गोडाऊनवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मुद्देमालासह १ लाख ४ हजार ९५० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

लाखोंचा गुटखा जप्त
लाखोंचा गुटखा जप्त

बुलडाणा -जिल्ह्यात लपून-छपून ठेवलेल्या लाखो रुपयाचा गुटखा खांमगाव आणि संग्रामपूर येथील गोडाऊनवरुन पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत ही कारवाई केली आहे. या कारवाईत ३ आरोपींना अटक करण्यात आले आहे. तर १ आरोपी फरार झाला आहे.

संग्रामपूर तालुक्यातील लाडणापुर येथे गुटखा गोडाऊनवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने छापा टाकून १० लाख ३२ हजार ५७० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणात आरोपी देवीलाल जयस्वाल, नितीन जयस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी धीरज जयस्वाल हा फरार झाला असून सोनाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर खामगांव येथील तलाव रोडवरील सिंधी कॉलोनी भागातील शंकर वाधवानी यांच्या गोडाऊनवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मुद्देमालासह १ लाख ४ हजार ९५० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तर खांमगाव येथील गोडाऊनमधून एकूण १ लाख ४ हजार ९५० रुपयांचा सुगंधित पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details