बुलढाणा : यंदा पावसाच्या परिस्थितीमध्ये पाऊस जून महिन्यामध्ये कमी असणार आहे. जुलैमध्ये साधारण तर ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असणार आहे. अतिवृष्टीचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी असेल, मात्र अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पिकाबाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाचे पीकं सांगण्यात आली आहे. मात्र उत्पन्न चांगले असले तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार आहे, असे भाकीत यंदाच्या भविष्यवाणीमध्ये वर्तवण्यात आले आहे.
देशाचा राजा तनावात राहील :राजकीय परिस्थितीवरही यंदा भाकीत केल्या गेले आहे. यामध्ये देशाचा राजा कायम असणार, म्हणजे पंतप्रधान कायम राहील असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. मात्र पारावरच्या घट मांडणीत पहिल्यांदाच विंचू निघाल्याने देशात रोगराईची परिस्थिती असणार, असे भाकीत यंदा वर्तवण्यात आले आहे. मात्र देशात रोगराईचे प्रमाण वाढलेले राहील. तसेच परकीयांचे त्रास जास्त असल्याने राजाला ताणाव राहील. व महाराष्ट्राचा राजा म्हणजे मुख्यमंत्री यांच्याविषयी बोलणे टाळले, कारण ही भविष्यवाणी देशाची असते, राज्याची नसते असे उत्तर महाराज यांनी दिले. भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीते दरवर्षी जाहीर केले जातात.