महाराष्ट्र

maharashtra

बुलडाण्यात विहिरीत आढळले आई आणि मुलीचे मृतदेह

By

Published : May 19, 2021, 4:00 AM IST

माळवंडी शिवारमधील गट क्रमांक 184 मधील शेतातील विहीरीत एक महिला व मुलीचा शव असल्याची माहिती पोलीस पाटील संजय चव्हाण यांनी दिली. पोलिसांचा एक पथक घटनास्थळी दाखल होऊन दोघींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

विहिरीत आढळले आई आणि मुलीचे मृतदेह
विहिरीत आढळले आई आणि मुलीचे मृतदेह

बुलडाणा - तालुक्यातील रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील माळवंडी गावाजवळील शेतातील विहिरीत तीस वर्षीय आई व तीन वर्षीय मुलीचे प्रेत आढळले आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून दोघींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतकाचे नाव पल्लवी गणेश चव्हाण व मुलगी जान्हवी चव्हाण असल्याचे समोर आले आहे.

माळवंडी शिवारमधील गट क्रमांक 184 मधील शेतातील विहीरीत एक महिला व मुलीचा शव असल्याची माहिती पोलीस पाटील संजय चव्हाण यांनी दिली. पोलिसांचा एक पथक घटनास्थळी दाखल होऊन दोघींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मृतकाचे पल्लवी गणेश चव्हाण व तिची मुलगी जान्हवी चव्हाण असल्याचे समोर आले असून पल्लवीने आपल्या मुलीसोबत आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पोलीस पाटील चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details