महाराष्ट्र

maharashtra

शहापूर गावाजवळ बसची ट्रकला मागून धडक, 17 प्रवासी जखमी

By

Published : Mar 24, 2021, 5:57 PM IST

Updated : Mar 24, 2021, 6:05 PM IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शहापूर गावाजवळ पुलावर बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले आहेत.

bhandara accident
बसची ट्रकला मागून धडक

भंडारा - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शहापूर गावाजवळ पुलावर बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले असून, 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर भंडारा जिल्ह्य सामान्य रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने एका ट्रकला मागून धड़क दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक बंद राहिली, मात्र काही काळानंतर वाहतूक सुरळीत केली.

शहापूर गावाजवळ बसची ट्रकला मागून धडक

हेही वाचा -बीड जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून दहा दिवस लॉकडाऊन

अचानक ब्रेक लावण्याने झाला अपघात

राज्य परिवहन महामंडळ साकोली बसस्थानकाची बस क्रमांक एम एच 40 एन 8603 नागपुर वरून प्रवासी घेऊन गोंदियाच्या दिशेने निघाली होती. भंडारा तालुक्याच्या शहापूर या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर या बसने तिच्या पुढे नवीन ऑटो वाहतूक करणाऱ्या ट्रक ला अचानक जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यामुळे बस चा डावा दर्शनी भागाचा अक्षरशा चुराडा झालेला आहे. या ट्रकच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे बसवर नियंत्रण करता आलं नाही असं बस चालकांनी सांगितले आहे.

सतरा प्रवासी झाले जखमी

दुपारी साडेतीनच्या दरम्यान झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. बस ची दर्शनीय परिस्थिती बघता मोठ्या प्रमाणात प्रवासी जखमी झाले असावे असा अंदाज होता मात्र कुठलीही जीवित हानी झाली नाही तर तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून 17 प्रवासी जखमी झालेले आहेत. यामध्ये तनवीर सय्यद, शबाना कुरेशी, अपूर्वा सेलोकर, विशाखा राघोर्ते, सविता रामटेके, सुख चरण रामटेके, प्यारेलाल जोशी अशा काही जखमींची नावे माहिती पडली आहे. या सर्व प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले असून गंभीर तीन लोकांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहे.

हेही वाचा -कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने वाढली चिंता; शेअर बाजार निर्देशांकात ८७१ अंशांची पडझड

Last Updated : Mar 24, 2021, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details