महाराष्ट्र

maharashtra

भंडाऱ्यात झालेल्या २ वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

By

Published : Mar 5, 2019, 10:35 PM IST

साहिल विजय बांते (२१ वर्ष), राहुल मनोहर रामटेके (३६) वर्ष आणि सविता छगन घाटोळकर (५४ वर्ष) असे मृतांची नावे आहेत.

अपघात

भंडारा - जिल्ह्यात झालेल्या २ वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह २ तरुण ठार झाले आहेत. भंडारा तालुक्यातील दवडीपार येथे २ भरधाव दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत २ युवकांचा मृत्यू झाला. तर लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळ पतीच्या दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. साहिल विजय बांते (२१ वर्ष), राहुल मनोहर रामटेके (३६) वर्ष आणि सविता छगन घाटोळकर (५४ वर्ष) असे मृतांची नावे आहेत.

दवडीपार गावाजवळ झालेल्या अपघातात गाडीवर असलेल्या दोघांच्याही डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत साहिल बांते हा भंडारा येथील साईनाथ नगरचा रहिवासी होता. तो ब्रह्मपुरी येथील बापुराव देशमुख तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. दोन दिवस सलग सुट्ट्या असल्याने तो गावी आला होता. मंगळवारी दुपारी घरून ब्रह्मपुरीला जात असताना त्याचा अपघात झाला. राहुल हा पवनी तालुक्यातील मोखारा गावातला रहिवासी होता. राहुल रामटेकेच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ मोठी गर्दी केली होती.

तर दुसर्‍या घटनेत लाखणी तालुक्याच्या लाखांदूर येथे सकाळी ९ वाजताच्या सुमारास झाला. सविता घाटोळकर या गोंदिया जिल्ह्यातील बाराभाटी येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या. त्या पती छगनच्या दुचाकीवरून आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात असताना खड्ड्यातून दुचाकी उसळल्याने सविता खाली कोसळल्या, त्यात त्यांच्या डोक्याला जबर मारहाण झाली. यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी पालांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details