महाराष्ट्र

maharashtra

Veerashaiva Lingayat Samaj : वीर शैव लिंगायत समाज हा मूळ हिंदू, बीडच्या कपिलधार येथील धर्मसभेत ठराव

By

Published : Nov 12, 2022, 9:58 PM IST

Updated : Nov 12, 2022, 11:06 PM IST

यात वीर शैव लिंगायत समाज ( Veerashaiva Lingayat Samaj ) हा मूळ हिंदू आहे. त्यामूळे आगामी जनगणनेत हिंदु धर्म म्हणूनच नोंद ( Lingayat Samaj is Hindu in origin ) करावी, असा ठराव बीड येथे झालेल्या धर्मसभेत ( Dharmasabha of Veerashaiva Lingayat Samaj ) मांडण्यात आला.

Veerashaiva Lingayat Samaj
Veerashaiva Lingayat Samaj

बीड - जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे वीरशैव लिंगायत समाजाची धर्मसभा ( Dharmasabha of Veerashaiva Lingayat Samaj ) संपन्न झाली. यात वीर शैव लिंगायत समाज ( Veerashaiva Lingayat Samaj ) हा मूळ हिंदू आहे. त्यामूळे आगामी जनगणनेत हिंदु धर्म म्हणूनच ( Lingayat Samaj is Hindu in origin ) नोंद करावी, असा ठराव धर्म सभेत घेण्यात आला आहे. तसेच वीर शैव लिंगायत समाजातील प्रश्नसंदर्भात एकत्रित येऊन लढा उभारला जाईल. रामदास पाटील सुंमठाणकर यांनी या धर्मसभेचे आयोजन केले होते. या धर्मसभेत लिंगायत समाजातील सर्व धर्मगुरूंची उपस्थिती होती. तसेच नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, ( Nanded MP Pratap Patil Chikhlikar ) बसवराज पाटील, श्री 108 सोमलिंग शिवाचार्य बुचकुंदेकर श्री 108 डॉ वीरूपाक्ष शिवाचार्य यांच्या सह हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.

वीर शैव लिंगायत समाज हा मूळ हिंदू
दरम्यान, वीरशैव लिंगायत समाजाचा धर्म कोणता यावरून वाद निर्माण केला जात होता, त्यावर आता पडदा पडला आहे. जाणीवपूर्वक हिंदू धर्म आणि लिंगायत समाज याच्यात दरी निर्माण करण्यासाठी समाजकंटक अशा पद्धतीने धर्म वरून वाद निर्माण करत होते. लिंगायत समाजातील प्रत्येकाने हिंदू धर्म म्हणूनच नोंद घ्यावी असाही सांगण्यात आलं.
Last Updated : Nov 12, 2022, 11:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details