महाराष्ट्र

maharashtra

परळीत व्यापाऱ्याला मारहाण, धनंजय मुंडे म्हणाले...

By

Published : Feb 18, 2020, 7:47 PM IST

Updated : Feb 18, 2020, 8:44 PM IST

व्यापारी अमर देशमुख यांच्या लीगल प्रॉपर्टीवर गणेश कराड यांनी कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी न ऐकल्यामुळे यांच्या दुकानांमध्ये जाऊन गणेश कराड आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

dhananjay mundes supporters hitting by traders
परळीत धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांची गुंडागर्दी

बीड- प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. अमर देशमुख, असे मारहाण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री

सीसीटीव्हीमध्ये अमर देशमुख यांना 5 ते 6 लोक मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. गणेश कराड यांनी त्यांच्या समर्थकांसह अमर देशमुख यांना मारहाण केली. गणेश कराड हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याची माहिती आहे.

अमर देशमुख यांच्या लीगल प्रॉपर्टीवर गणेश कराड यांनी कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी न ऐकल्यामुळे यांच्या दुकानांमध्ये जाऊन गणेश कराड आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केली.

  • गुंडगिरीला कधीही थारा दिला नाही आणि देणारही नाही-

यावर जे कुणी कायदा हातात घेऊन इतरांना त्रास होईल असे वर्तन करतील, त्यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील. परळी शहरात झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत माझे नाव जोडले जात आहे. मात्र, परळीकरांना पूर्ण विश्वास आहे की, धनंजय मुंडे अशा गुंडगिरीला कधीही थारा देणार नाही, असा खुलासा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.

Last Updated : Feb 18, 2020, 8:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details