महाराष्ट्र

maharashtra

पतीकडे सोडण्याच्या बहाण्याने बलात्कार; आरोपीचा शोध सुरू

By

Published : Oct 27, 2020, 10:21 PM IST

पतीकडे सोडतो म्हणत घरातून नेत जीवे मारण्याची धमकी देत एका खोलीत तब्बल 24 दिवस बलात्कार करणाऱ्या ऊसतोड मुकादमाविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

बीड पोलीस अधीक्षक कार्यालय
बीड पोलीस अधीक्षक कार्यालय

बीड- दोन वर्षांपासून पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला पतीकडे सोडण्याच्या बहाण्याने एकाने भाड्याच्या खोलीत ठेऊन जीवे मारण्याची धमकी देत 24 दिवस अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (दि. 27 ऑक्टोबर) शहरातील आदर्शनगरात उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित 30 वर्षीय महिला बीड तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. तिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिला तीन वर्षांची एक मुलगी आहे. कौटुंबिक कलहातून पतीने नांदविण्यास नकार दिल्याने ती दोन वर्षांपासून माहेरी राहते. दरम्यान, 1 ऑक्टोबरला तुला पतीकडे सोडतो, असा बहाणा करत ऊसतोड मुकादम असलेल्या राजेश छगन राठोड (रा.अंथरवणपिंप्री ता.बीड) हा तिला तीन वर्षांच्या मुलीसह घेऊन बीडला आला. बसस्थानकात रात्री मुंबईला जाण्यासाठी बस नसल्याने आजच्या दिवस भाड्याच्या खोलीत राहू, असे सांगून तो तिला आदर्शनगरात घेऊन आला. त्या खोलीत त्याने त्या रात्री तिच्यावर बळजबरी केली. तिने विरोध केल्यावर तुझ्यासह तुझ्या मुलीला ठार मारीन, अशी धमकी त्याने दिली. 1 ते 24 ऑक्टोबरपर्यंत त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, मंगळवारी पीडितेने शिवाजीनगर ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन राजेश राठोडवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. राजेशने पळ काढला असून त्याचा शोध सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details