बीड -रात्रगस्तीवर असेलेल्या गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना धूळे-सोलापूर महामार्गावर गढी उड्डाणपुलावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.
विवेक सदाशिव कांबळे (वय 34) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची गेवराई पोलीस ठाण्यात नेमणूक झाली होती. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी उड्डाणपुलावर ते पेट्रोलिंग करत होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास कांबळे हे पोलीस व्हॅनमधून (एमएच 23 एफ 5143) उतरले असता अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.